Shivsena : शिवसेनेचा वर्धापन दिन आम्हीच साजरा करणार – मंत्री शंभूराज देसाई

राऊतांविरोधात हक्कभंगाबाबत आम्ही सुमोटो घेऊन कारवाई करण्याची मागणी करणार आहोत, असे देसाई यांनी सांगितले.

202
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल देत असताना 16 आमदारांच्या अपात्रेचा निकाल विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत. आम्ही आमची बाजू विधानसभा अध्यक्षांसमोर मांडू त्याबद्दलची रणनीती आमची काय असेल ? याबद्दल आम्ही लवकरच ठरवू. तसेच मुंबई महापालिकावर शिवसेना-भाजपचा महापौर बसवणार आणि खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन 19 जून रोजी आम्हीच साजरा करू अशा प्रकारचे प्रतिपादन मंत्री शंभूराजे देसाई यांनी गुरुवार, १८ मे रोजी केले.
देसाई पुढे म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेच्या अर्जावर विधानसभा अध्यक्ष आमदारांना नोटीस बजावणार आहेत. त्यावर आम्ही आम्हाला झालेल्या त्रासाची कैफियत लेखी मांडणार आहोत. संजय राऊतांनी आमच्याविरोधात जी काही वक्तव्ये केली आहेत, त्याचे पुरावे आम्ही जोडणार आहोत. राऊतांविरोधात हक्कभंगाबाबत आम्ही सुमोटो घेऊन कारवाई करण्याची
मागणी करणार आहोत, असे देसाई यांनी सांगितले.

मुंबईचा महापौर आमचाच असणार…

मागील काही दिवसांपासून माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते (उबाठा) आदित्य ठाकरे हे राज्यपालांकडे मुंबईच्या विषयांवरती पत्रव्यवहार करत आहेत. तक्रारी करत आहेत. त्यांचे जे काही म्हणणे असेल ते त्यांनी मुख्यमंत्र्यांना द्यावे. त्यांना त्यांच्या काळात जे जमले नाही ते आता आम्ही करून दाखवत आहोत. मुंबईचा विकास आम्हीच करणार आणि आम्हीच मुंबईचा महापौर देखील बसवणार असे देखील मंत्री देसाई म्हणाले.

संजय राऊत हे विश्व प्रवक्ते

राज्यात, देशात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काहीही घडलं तर त्यावर नाक खूपसत असण्याची सवय संजय राऊत यांना आहे, त्यामुळे त्यांना विश्व प्रवक्ते म्हणावे की काय अशी परिस्थिती सध्या आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.