राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दुस-या उमेदवाराच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. संजय पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याचे संजय राऊत यांनी घोषित केले आहे. त्यामुळे शिवसेनेने राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात संजय राऊत आणि संजय पवार यांना उतरवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राऊतांनी ही घोषणा केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार
संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात येईल अन्यथा दुस-या उमेदवाराचे नाव जाहीर करण्याचा विचार शिवसेनेकडून सुरू होता. यासाठी कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे नाव पुढे येत होते. अखेर बुधवारी त्यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. गुरुवारी शिवसेनेचे दोन्ही संजय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
(हेही वाचाः छत्रपतींच्या वंशजांच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न, संभाजीराजेंसाठी मनसेचा शिवसेनेवर हल्ला)
संभाजीराजे विरुद्ध शिवसेना सामना नाही
उमेदवार निवडून येण्यासाठी जितकी मते गरजेची आहेत, त्यापेक्षा अधिकची मते आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्हाला कुठलीही चिंता नाही. शिवसेनेची सहावी जागा सुद्धा निवडून येणार असल्याचा विश्वास, यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. जितकी मतं तसेच या निवडणुकीत संभाजीराजे विरुद्ध असा कुठलाही सामना होणार नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community