“…तर वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाही?”, शिवसेनेचा भाजपला सवाल

174

गुरूवारी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या निवासस्थानावर ईडीने छापेमारी केली. ईडीच्या माध्यमातून परबांची चौकशी झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना आमने-सामने येत त्यांच्यातच जुंपल्याचे पाहायला मिळाले. अद्याप एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप सुरूच असून आज शुक्रवारी, शिवसेनेने पत्रकार परिषद देत भाजपावर निशाणा साधला. यावेळी शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत लक्ष्य केलंय. भाजप नेहमीच हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत असते, मग वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाही, असा सवाल त्यांनी भाजपला केला आहे.

(हेही वाचा – एसटी बस २० फूट दरीत कोसळली, १५ गंभीर जखमी प्रवाशांवर उपचार सुरू)

काय म्हणाले अरविंद सावंत?

हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून भाजपाला प्रश्न विचारतांना अरविंद सावंत म्हणाले, भाजप नेहमी हिंदुत्वाच्या मुद्दा पुढे रेटतं, मग सावरकरांना भारतरत्न का देत नाही? सावरकरांचे कार्य पाहता त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी शिवसेना आणि भाजपच्या वतीने करण्यात येते. केंद्रात भाजपचं सरकार आहे, तर हिंदुत्वावर अधिकारवाणीने बोलणाऱ्या भाजपने त्यांना भारतरत्न द्यावा, अन् त्यांच्या कार्याचा गौरव करावा, असं शिवसेनेच्या वतीने म्हटले जात आहे.

यासह पुढे ते असेही म्हणाले, ईडीचा प्रवक्ता असे सांगतो की, उद्या या व्यक्तीला अटक होणार आणि ती होते. पण जेव्हा काही माणसावर आरोप होतात. तेव्हा झेड प्लस सुरक्षा केंद्राकडून दिली असताना तो पळतो. सध्या महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे. मी जेव्हापासून राजकारणात आणि शिवसेनेत सक्रीय आहे तेव्हापासून मी कधीही इतक्या खालच्या पातळीचे राजकारण पाहिले नाही. आम्ही मागची पाच वर्षे तुमच्या सोबत होतो ना… तेव्हा फडणवीसांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच नंतर पक्षात घेतलं. त्यांच्या पक्षात गेले की, हे लोकं दोषमुक्त झाले. पण जे गेले नाहीत त्यांना आता प्रशासकीय यंत्रणेचा आधार घेत त्रास दिला जातोय, असे सावंत यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.