महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक महत्वाचा वाद म्हणजे शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचे होणार शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे होणार? हा विषय चर्चेत होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने याविषयावर दोन्ही गटाची सुनावणी घेतली. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांचा निर्णय राखून ठेवला होता. अखेर शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे दोन्ही एकनाथ शिंदे यांना दिले. त्यामुळे आता शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच झाली आहे.
निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळावे या मागणीसाठी याचिका दाखल केली होती. त्यावेळी ठाकरे गटानेही कॅव्हेट दाखल करून ठाकरे गटाची बाजू ऐकून घेऊनच निर्णय द्यावा, अशी मागणी केली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या सुनावण्या निवडणूक आयोगाने घेतल्या, मधल्या काळात पोट निवडणुकीच्या वेळी आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. मात्र आत निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
Join Our WhatsApp Community