कोकणात पुन्हा सेना-भाजपमध्ये राडा! काय आहे कारण?

114

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडी दरम्यान शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची होऊन राडा झाला. नगरपंचायतीकडे जाणारा मार्ग पोलिसांनी बंद केला असताना आमदार वैभव नाईक यांनी त्याठिकाणी आपली गाडी आणल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ती रोखली. या प्रकारावरून शिवसेना-भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊन दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे हे प्रकरण शांत झाले खरे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी

कुडाळ नगरपंचायतमध्ये आज नगराध्यक्षपदाची निवडणूक होती. निवडणूक असल्याने नगरपंचायत मार्गावरील वाहतूक पोलिसांनी बंद केली होती. यावेळी काँग्रेसचे उमेदवार घेवून आमदार वैभव नाईक नगरपंचायत येथे आले. नगरपंचायत परिसरात बंदी असताना आमदार नाईक यांची गाडी नगरपंचायत कार्यालय येथे कशी काय येवू दिली, असा जाब भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिसांना विचारला. तर पोलिस प्रशासनाच्या भूमिकेबाबत भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांची गाडी रोखल्याने शिवसेना-भाजपा पदाधिकार्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची होत धक्काबुकी झाली. यामुळे येथील वातावरण तणावपूर्वक बनले. दरम्यान पोलिस प्रशासनाने आमदार वैभव नाईक यांची गाडी तेथे न थांबविता पुढे नेण्यास सांगितले. तसेच दोन्हीही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बाजुला केल्यामुळे हा वाद काही काळ शमला पण वातावरण तणावपूर्ण होते.

(हेही वाचा कोविड घोटाळ्यात संजय राऊत अडकल्याने त्यांची नौटंकी सुरु! किरीट सोमय्या आक्रमक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.