मोठी बातमी! तपास यंत्रणेच्या रडारवर आता शिवसेनेचा ‘हा’ नेता

139

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ईडीचा कारवाईचा जोर दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेतेही ईडीच्या रडावर आहेत. नुकतेच बुधवारी, २३ फेब्रुवारी रोजी ८ तासांची चौकशी ईडीने केल्यावर मनी लॉण्डरिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. ईडीने अटक केली, त्यानंतर त्यांना पीएमएलए विशेष न्यायालयाने ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता तपास यंत्रणेच्या रडारवर शिवसेनेचा एक नेता असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

(हेही वाचा – आजपासून मुंबईत पुन्हा जमावबंदी लागू, काय आहे कारण?)

जाधवांच्या घरी सकाळीच आयकर विभागाची धाड 

मुंबई महानगर पालिकेतील शिवसेनेचे नेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, यशवंत जाधवांची आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. बेनामी संपत्ती प्रकरणी यशवंत जाधव आणि त्यांची आमदार पत्नी यामिनी जाधवांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते. आयकर विभागाच्या केंद्रीय पथकाने यशवंत जाधवांच्या घरी शुक्रवारी सकाळीच धाड टाकली असून त्यांची कसून चौकशी होत आहे. या तपास पथकासह यशवंत जाधव यांच्या घरी सीपीआरएफचे जवान देखील दाखल झाले आहे.

यशवंत जाधव यांच्यावर काय आहेत आरोप

  • यशवंत जाधवांवर १५ कोटी घोटाळ्याचा आरोप
  • हे १५ कोटी रूपये यूएईला हलवल्याचा सोमय्यांनी आरोप केला होता.
  • बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १५ कोटींचा घोटाळा केल्याचे उघड

मविआच्या नेत्यांमागे ईडीची पीडा

महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांच्या नेत्यांवरही ईडीचा डोळा असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत ईडीची पीडा लागणार असल्याचे संकेत अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत. तसेच, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणाकडून होणारी चौकशी, हा शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याची चर्चा सध्या सरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.