दिवाळी वाटपात शिवसेना नगरसेवक पुढे

104

दीपावलीला अगदी काही दिवस शिल्लक राहिले असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत पोहोचण्यास राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येक घरांमध्ये जावून दिवाळी भेट वाटप सुरु झाले असून यामध्ये शिवसेना नगरसेवकच पुढे असल्याचे पहायला मिळत आहे.

कोणत्या नगरसेवकांनी काय वाटप केले?

दिवाळीनिमित्त आता प्रत्येक नगरसेवक दिवाळीचा फराळ, तसेच फराळ बनवण्याचे साहित्य, सुगंधित उटणे, साबण आदी वस्तूंचे किट भेट म्हणून देत असतात. यंदा मात्र, अशा प्रकारे वस्तूंचे किट देण्यामध्ये शिवसेना नगरसेवक पुढे असल्याचे दिसून येत आहे.

New Project 72

वडाळा येथील शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी मोफत दिवाळी फराळ साहित्य रवा, बेसन, मैदा, साखर, पोहे, उटणे व पर्यावरणपूरक बॅग यांचे ५ हजार कुटुंबांना वाटप करण्याचा संकल्प केला असून या बॅगचे वाटप सुरु आहे.

तर शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक १९२ च्या नगरसेविका प्रिती पाटणकर यांनीही दिवाळीनिमित्त फराळ साहित्यांचे वाटप केले.

New Project 73

प्रभाग क्रमांक १९४चे नगरसेवक समाधान सरवणकर यांनी लोकांना पणती व उटण्यांचे वाटप केले.

वरळीतील प्रभाग क्रमांक १९३ मधील नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनीही विभागातील दीपावलीनिमित्त स्वस्त दरात धान्य वितरण करण्यास सुरुवात केली आहे.

New Project 74

तर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यांनी भायखळ्यातील जनतेला सवलतीच्या दरात दिवाळी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. कोरोना काळात निराधार झालेल्या कुटुंबांना मोफत साहित्यही देण्यात आले. मात्र, एरव्ही भाजपचे नगरसेवक पुढे असतात. परंतु यंदा भाजप दिवाळी वाटपात जास्त पुढे असल्याचे दिसून येत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.