राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडताना दिसताय. राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षादरम्यान मुख्यमंत्रीपदावर कोण विराजमान होणार याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. या सुरू असलेल्या चर्चांना गुरूवारी देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. कारण फडणवीसांनी केलेल्या घोषणेप्रमाणे एकनाथ शिंदे हे आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहे. त्यांच्या नावाची घोषणा होताच त्यांनी पहिले ट्विट केले आहे.
(हेही वाचा – नगरसेवक ते मुख्यमंत्री : एकनाथ शिंदेंची २५ वर्षांची कारकीर्द)
काय केले शिंदेंनी ट्विट
देवेंद्र फडणवीसांच्या धक्कादायक घोषणेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. एकनाथ शिंदे गुरुवारी संध्याकाळी ७.३० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. या घोषणेपूर्वी एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले आहे. मुख्यमंत्रीपदी नावाची घोषणा होताच एकनाथ शिंदे हा वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा विजय…! महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटीबद्ध…असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच स्वत:ची पर्वा न करता, हिंदूत्वासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी न घाबरता सत्तात्याग करून वेगळी भूमिका मांडण्याची धमक दखावणाऱ्या सहकारी आमदारांचे ही त्यांनी आभार मानले.
तसेच स्वत:ची परवा न करता,हिदूत्वासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी न घाबरता सत्तात्याग करून वेगळी भूमिका मांडण्याची धमक दखावणार्या माझ्या सहकारी आमदारांचे ही आभार#MaharashtraFirst
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 30, 2022
यापुढे शिंदे असेही म्हणाले, आमदारांचे संख्याबळ पाहता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे ठेवू शकले असते. पण त्यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवला. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला याबद्दल देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो.
Join Our WhatsApp Community