“… तर नावं सांगा”, हॉटेल बाहेर येताच एकनाथ शिंदेंचं ठाकरेंना चॅलेंज

129

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे सध्या गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये आपल्या गटातील आमदारांसह राहत आहेत. सोशल मीडियाच्या मध्यमातून शिंदे आपली भूमिका मांडत असताना आज, मंगळवारी पहिल्यांदाच ते हॉटेलबाहेर आले आहेत. बाहेर येताच त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाबद्दल बोलताना थेट आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले. दरम्यान, शिवसेनेते नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी शिंदे गटातील १६ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले होते. या वक्तव्यावर शिंदेंनी हॉटेलच्या परिसरातून प्रत्युत्तर दिले आहे.

(हेही वाचा – एकनाथ शिंदे पहिल्यांदाच हॉटेलबाहेर, सत्तास्थापनेबाबत केलं मोठं विधान)

गेल्या सात दिवसांनंतर आज, मंगळवारी एकनाथ शिंदे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत. यावेळी त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ठाकरेंनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांनी कोण आमदार संपर्कात आहेत हे सांगावं. त्यांची नावं सांगावीत, असे म्हणत त्यांनी ठाकरेंना आव्हान दिले आहे. पुढे ते म्हणाले, आमदार तुमच्या संपर्कात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र, सर्व ५० आमदार या ठिकाणी स्वत:च्या इच्छेने आले आहेत. त्यांना कोणीही जबरदस्ती नाही केली. ते सुरक्षित आहेत. बाळासाहेबांची खरी शिवसेना हीच आहे, असं शिंदे म्हणाले.

गेल्या आठवडाभरापासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थनार्थ असलेले आमदार हे रेडिसन ब्लूमध्ये असून, एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दुपारी हॉटेलमध्ये बाहेर येऊन पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. काळजी करू नका, आम्ही लवकरच मुंबईत परत येणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितले. तसेच दीपक केसरकर हे आमच्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते असून ते वेळोवोळी माध्यमांसमोर आमची भूमिका स्पष्ट करत आहेत. राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबतची आमची भूमिकाही केसरकर यापुढे माध्यमांना सांगतील, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.