आज, मंगळवारी शिंदेगटासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण आजच शिंदे गटाला निवडणूक चिन्ह मिळणार आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला आज सकाळी १० वाजेपर्यंत पर्याय सादर करण्याची मुदत दिली होती. अशातच शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर ३ चिन्हांचा पर्याय सादर करण्यात आले आहे. ईमेल करून हे तीन पर्याय शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केले आहेत.
(हेही वाचा – धनुष्यबाण चिन्हाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मोठा दावा, म्हणाले…)
शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेल्या निवडणूक चिन्हामध्ये कोणते चिन्ह आहेत याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. तर शिंदे गटाकडून दोन ईमेल निवडणूक आयोगाला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या ईमेलमध्ये शिंदे गटाकडून रिक्षा, तुतारी आणि शंख हे तीन पर्याय सुचविण्यात आले होते. तर दुसऱ्या ईमेलमध्ये तीन चिन्हं सादर करण्यात आले त्यामध्ये ढाल-तलवार, सूर्य, पिंपळाचं झाड या तीन पर्यायांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, शिंदे गटानेही तीन चिन्ह सादर केले होते. त्यामध्ये उगवता सूर्य, त्रिशुळ आणि गदा हे तीन पर्याय दिले होते. तर ठाकरे गटाच्या शिवसेनेने तीन चिन्ह सादर केले असून यामध्ये उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ असे तीन पर्याय दिले होते. मात्र या दोन्ही गटाकडून सादर केलेल्या चिन्हांपैकी दोन चिन्ह सारखे असल्याने ते कोणालाच देण्यात आली नाही. गदा हे चिन्ह निवडणूक आयोगाने नाकारत दुसरे पर्याय देण्यास सांगितले होते. त्यानुसार शिंदे गटाने तीन निवडणूक चिन्ह आयोगाला ईमेलद्वारे सादर केल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community