जे गुवाहाटीत आहेत, त्यांना मुंबईतच यावं लागेल. त्यांचं स्वागत आपण करणार आहोत. ज्या दोन फ्लोअर टेस्ट होतील, त्यासाठी जेव्हा ते येतील तो रस्ता दादरमधून जातो… भायखळ्यातून रस्ता जातो. त्यांना शिवसैनिकांना सामोरं जावं लागेल. हे त्यांनी विसरू नये. महिला आघाडीने त्यांना समजावून सांगण्याची जबाबदारी घेतली आहे, तसं या आघाडीने सांगितलं आहे. महिला आघाडी कसं समजावतात ते मला माहिती नाही, मी अजून बघितलं नाही, असं सांगत शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या बंडखोरांच्या विरोधात आक्रमण करायला त्यांच्या मार्गावर सेनेच्या रणरागिणी पहिल्या फळीचे नेतृत्व करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
प्रत्येक पक्षाचा डोळा मुंबईवर
शिवसेनेचे ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फुटून त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर या पक्ष फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक ११ मधील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा शनिवारी महालक्ष्मी रेस कोर्स जवळील लाला लजपतराय महाविद्यालय सभागृहात आयोजित केला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी, माझा आवाज हॉलमध्ये पोहोचत असला तरी हा तुमचा आवाज गुवाहाटीपर्यंत पोहोचला आहे, असे सांगत प्रत्येक पक्षाचा डोळा मुंबईवर आहे आणि थोडा आवाज आपण फ्लोअर टेस्टसाठी ठेवा , असे सांगितले.
जी घाण होती ती निघून गेली
भास्कर राव तुम्ही म्हणालात मुंबईवर डोळा आहे, पण आम्ही आमच्या मुंबईला नजर लावू दिली नाही, असे सांगत आदित्य यांनी चौधरी साहेबांना आम्ही मध्ये बसवले. बाकीच्यांना वाटेल की ते पळत होते म्हणून आम्ही मध्ये बसवले म्हणून असेही मिश्किल पणे ते म्हणाले. असो जी घाण होती ती निघून गेली, आता जे होणार ते चांगलंच होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आदित्य ठाकरे यांनी दिले संकेत
काळोखात आमदारांना पळवून नेलं. पण लक्षात ठेवा माझं नाव आदित्य आहे. आदित्य म्हणजे सूर्य, जिथे प्रकाश नाही तिथे प्रकाश पाडू असाही विश्वास व्यक्त करत त्यांचं स्वागत आपण करणार आहोत. दोन फ्लोअर टेस्ट होतील, एक आतमध्ये आणि दुसरी बाहेर. मुंबईतच यावं लागेल त्यांना असेही ते म्हणाले. याचा आधार घेतच ते म्हणाले, त्यांच्या मुंबईतील तिथे पोहोचण्याचा रस्ता दादरमधून रस्ता जातो…. भायखळ्यातून रस्ता जातो… शिवसैनिकांना सामोरं त्यांना जावंच लागेल असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला. महिला आघाडीने त्यांना समजावून सांगण्याची जबाबदारी घेतली आहे, तसं या आघाडीने सांगितलं आहे. महिला आघाडी कसं समजावतात ते मला माहिती नाही, मी अजून बघितलं नाही, असं सांगत त्यांनी अप्रत्यक्ष या बंडखोरांविरोधात लढायला महिला आघाडी पुढे असेल असे संकेत देत आता निवडणुका लागल्या तर आपणच निवडून येणार असाही विश्वास व्यक्त केला.
Join Our WhatsApp Community