अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना ठाकरे-शिंदे प्रकरणावर येत्या काही दिवसांत निकाल येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. उद्धव ठाकरे गटासह विरोधक गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूकंपाची शक्यता व्यक्त करत आहेत. अशातच सोमवारी, २४ एप्रिल रोजी होणारी निवडणूक आयोगाच्या धनुष्यबाण निर्णयाविरोधातील सुनावणी होणार नसल्याचे समोर आले आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे गटाला दिले होते. याविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला होता. या याचिकेवर सुनावणीचा पुढील तारीख ही २४ एप्रिल ठरली होती. परंतू सर्वोच्च न्यायालयाच्या उद्याच्या कामकाजामध्ये या प्रकरणाचा उल्लेखच नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावर काही दिवसांत निकाल येणार आहे. यामुळे धनुष्यबाणाच्या याचिकेवरील सुनावणी या निकालानंतरच होण्याची शक्यता आहे. आता घेतली तर कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतात, असे राजकीय वर्तुळात अंदाज लावले जात आहेत.
(हेही वाचा खलिस्तानी अमृतपाल सिंग पोलिसांच्या ताब्यात)
Join Our WhatsApp Community