शिवसेनेचा विरार (पूर्व) येथील विभागप्रमुख जितेंद्र खाडे हा एका महिला रिक्षा चालकाला वारंवार संपर्क करून शरीरसुखाची मागणी करत होता. अखेर त्याला २४ जानेवारी रोजी रस्त्याच पकडला आणि तुला आयटम पाहिजे का?, असे विचारत त्याला भर रस्त्यात रिक्षात कोंबून त्या महिलेने चपलेने चोपून काढले.
खाडेच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा
एका रिक्षाचालक महिलेला खाडे वारंवार फोन करून, महिला आयटम आहे का?, अशी विचारणा करत होता. याला कंटाळून अखेर महिलेने जितू खाडे याला 24 जानेवारी रोजी पकडून रिक्षातच चपलाने बेदम चोप दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रस्त्यावर जमलेल्या बघ्यांपैकी कुणीतरी ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. त्यानंतर कालपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरार पोलिसांनी या घटनेची दखल घेतली. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरुन विरार पोलीस ठाण्यात खाडे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा न्यायालयीन अनिश्चिततेच्या चक्रव्यूहात सापडले संपकरी एसटी कर्मचारी)
खाडे याची हकालपट्टी
या घटनेचा शिवसेनेकडून निषेध करण्यात आला आहे. शिवसेनचे पालघर उपजिल्हा प्रमुख दिलीप पिंपळे यांनी जितू खाडेच्या कृतीचा निषेध केला असून खाडेच्या कृतीला आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांनी पत्रक काढून खाडे याची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले आहे.
Join Our WhatsApp Community