युतीबाबतचे ‘ते’ वक्तव्य अब्दुल सत्तारांसाठी ठरतेय डोकेदुखी

शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी नितीन गडकरी हेच भाजप आणि शिवसेना युतीचा पूल बांधू शकतात असं वक्तव्य केलं होतं. आता या गोष्टीला काही तास उलटत नाहीत तोच त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची गळाभेट घेतली आहे. त्यामुळे आता राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

माझं वक्तव्य वैयक्तिक

अब्दुल सत्तार सध्या दिल्ली दौ-यावर आहेत. त्यांनी बुधवारी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रलंबित मागण्यांसाठी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. या भेटीनंतर सत्तार यांनी मीडियाशी संवाद साधला. माझ्या मतदारसंघातील रेल्वे संदर्भात मी त्यांना भेटण्यासाठी आलो. जळगाव-सोलापूर रेल्वे सुरू व्हावी, म्हणून मी भेटण्यासाठी आलो होतो. यावेळी त्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या टीकेलाही उत्तर दिलं. सर्व विषयावर बोलण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. मी मंगळवारी केलेलं वक्तव्य वैयक्तिक आहे, पक्ष किंवा सरकार म्हणून नाही. माध्यमानी विचारलं म्हणून मी उत्तर दिलं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

(हेही वाचा: गोपीचंद पडळकरांना होणार अटक? अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल! )

काय म्हणाले होते सत्तार

उद्धव ठाकरे हे राज्यातील कर्तव्यदक्ष राजकारणी आहेत. महाराष्ट्राचे नेतृत्व ते उत्तम प्रकारे करत आहेत. तर नितीन गडकरी हे महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे नेते आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीचा पूल जोडायचं त्यांनी मनावर घेतलं तर ते उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील, त्यांना विनंती करतील. कारण शेवटी भाजप-सेना युतीचा निर्णय उद्धव साहेबच घेऊ शकतात, असं अब्दुल सत्तार म्हणाले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here