महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच, आता शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांच्या बंडखोरीनंतर आता आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रोफाइलवरुन मंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे.
शिंदेंचा दावा खरा ठरला
सुरतमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर एकनाथ शिंदे पहाटेच 33 आमदारांना घेऊन गुवाहाटीला तळ ठोकून आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत आणखी आमदार येणार असल्याचा दावा केला होता. त्यांचा हा दावा आता खरा ठरला आहे. गुवाहाटी विमानतळावर आणखी एक सेनेचा आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी झाला आहे. आमदार योगेश रामदास कदम हे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत.
( हेही वाचा बच्चू कडूंनी शिवसेना आमदारांच्या नाराजीचे कारण सांगितले म्हणाले; “ज्या पद्धतीने…” )
म्हणून योगेश कदम यांचा शिवसेनेला घरचा आहेर
अनिल परब यांच्याविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्यांना रसद पुरवण्याचा आरोप रामदास कदम यांच्यावर झाला होता. त्यानंतर रामदास कदम हे विधान परिषदेतून निवृत्त झाले होते. पण सेनेने त्यांना संधी दिली नाही. योगेश कदम यांनाही पक्षाने डावलले होते. यामधूनच योगेश कदम यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.
Join Our WhatsApp Community