काश्मिरी पंडितांचा आक्रोश या सरकारला दिसत नाही; राऊतांचा केंद्रावर निशाणा

116

जम्मू -काश्मीरमध्ये मागच्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांचे हत्यासत्र सुरु आहे. गेल्या 20 दिवसांत दोन हत्या झाल्या आहेत. त्यावर भाष्य करताना, शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला घेरले. राजकारण आणि विरोधकांवर हल्ले, ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर यामध्ये गुंतलेल्या सरकारला काश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही, हे या देशाचं आणि देशातील हिंदूचं दुर्दैव असल्याचे राऊतांनी म्हटले आहे.

काश्मिरी पंडितांचा प्रश्न ऐरणीवर 

370 कलमाचा विषय नाही किंवा जम्मू काश्मीर हा केंद्राचा विषय झाला म्हणूनही काही फरक पडलेला नाही. काश्मीर पंडित रस्त्यावर उतरले आहेत आणि सामुदायिक स्थलांतर करण्याच्या संदर्भात त्यांनी सरकारला सूचना दिली आहे. केंद्रातले सरकार हे प्रखर हिंदुत्ववादी प्रखर राष्ट्रवादी आहे. तसेच काश्मिरी पंडितांच्या घर वापसीबाबत आग्रही असलेले सरकार आहे. नोटबंदीनंतर दहशतवाद संपूर्णपणे संपेल असे वचन देणारे सरकार आज काश्मीरमध्ये आमच्या काश्मिरी पंडितांचं, जवानांचं आणि अनेक मुस्लिम पोलीस अधिकारी मारले जात आहेत. त्यांचे रक्षण करु शकत नाही, कारण सरकार पूर्णपणे फक्त निवडणुका आणि राजकारण यात गुंतून पडले आहेत. त्यांनी देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेकडे काश्मीरधील प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. दुर्दैवाने फक्त राजकारण, विरोधकांवर हल्ले, ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर यामध्ये गुंतलेल्या सरकारला काश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही, हे या देशाचं आणि देशातील हिंदूचं दुर्दैव आहे असे म्हणत राऊतांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

( हेही वाचा: अहमदनगरचे नाव ‘अहिल्यानगर’ करा; पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र )

हार्दिक पटेल व्यवस्थेचे बळी  

तसेच, यावेळी त्यांनी राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले्या वक्तव्याचाही समाचार घेतला. पळकुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये अशा शब्दांत राऊतांनी दानवेंना सुनावले. तसेच, हार्दिक पटेल हा व्यवस्थेचा बळी पडल्याचे, राऊत म्हणाले.  देशद्रोहाची व्याख्या भाजपने हार्दिकबद्दल केली होती, असे राऊत यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.