राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स बजावले आहे. बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे या समन्समधून आदेश देण्यात आले होते. पण आता मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी 11 वाजता त्यांची चौकशी होणार होती. पण आधीच्या नियोजित कामामुळे ते चौकशीला हजर राहणार नाहीत. मात्र अनिल परब यांचे वकील ईडी कार्यालयात जाणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्याशी संबंधित सात संस्थांवर ईडीने काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर आता ईडीकडून अनिल परब यांना अटक होणार का अशा जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. अनिल परब यांना अटक झाल्यास मुंबई महापालिका निवडणुकीआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
( हेही वाचा: देशात हुकुमशाहीचे टोकं गाठले जात आहे; संजय राऊत यांचा हल्लाबोल )
साई रिसाॅर्ट प्रकरण काय
पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसाॅर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसाॅर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसाॅर्ट तोडायचे होते, मात्र 90 दिवस पूर्ण झाले असून, अजूनही रिसाॅर्ट पाडण्यात आले नाहीत.
Join Our WhatsApp Community