मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा झाल्यावर पुन्हा नेहमीप्रमाणे चर्चा सुरु झाली. याआधीच्या औरंगाबादच्या सभेनंतर राज ठाकरेंवर चारही बाजूने टीका झाली. आता पुण्यातील सभेनंतर पुन्हा शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली, मात्र शिवसेनेच्या एका नेत्याने राज ठाकरे यांच्या भाषणाचे तोंडभरून कौतुक केले. त्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
राज ठाकरेंच्या भाषणाच्या मुद्द्यांची चेष्टा नको
शिवसेनेचे रत्नागिरीमधील ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचे कौतुक केले. राज ठाकरेंचे भाषण हे राजकीयदृष्या प्रगल्भतेचे आणि वैचारिक पद्धतीचे होते, असे आमदार भास्कर जाधव म्हणाले. तसेच राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे गांभीर्याने पाहावे. राज ठाकरेंच्या भाषणाची चेष्टा करु नये, असेही ते म्हणाले. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द करण्याच्या वक्तव्यावरुन भाजपाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असल्याचे दिसून येते. भाजपाचे खरे रुप काय, त्यांनी काढलेली नखे राज ठाकरेंनी वेळीच ओळखली. म्हणून मी हे भाषण राजकीय प्रगल्भतेने घेण्याची गरज आहे. गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे म्हणत आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले.
(हेही वाचा दादर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त ‘हिंदु राष्ट्रा’चा हुंकार!)
Join Our WhatsApp Community