Shivsena : उद्धव ठाकरे २०१४मध्ये एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदही देण्यास तयार नव्हते – गजानन कीर्तिकर

127

सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असे उद्धव ठाकरे नेहमीच म्हणत असले, तरी २०१९ मध्ये सत्ता आल्यानंतर मात्र शिवसेनेचा (Shivsena) दासाठीचा चेहरा म्हणजेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले गेले नाही. २०१४ मध्ये तर उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेंना द्यावे लागेल म्हणून पक्षाने ते स्वीकारलेच नाही, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी ‘शिवसेना, लोकाधिकार आणि मी’, या स्वतःच्या राजकीय वाटचालीवर आधारित पुस्तक लिहिले असून त्यामध्ये हे सर्व दावे केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन झाले. राज्यात २०१९ ला महाविकास आघाडीची सत्ता आली. यावेळी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला (Shivsena) दिले, महत्त्वाची खाती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला दिली. वास्तविक सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपद देण्याची संधी असताना उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. हे काहीसे आश्चर्यजनक होते असे कीर्तिकर यांनी या पुस्तकात नमूद केले आहे.

(हेही वाचा India ऐवजी Bharat; काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?)

स्वतः पक्षप्रमुख मुख्यमंत्री होते. शिवाय तीन पक्षांचे सरकार चालवण्याची कठीण कसरत तर होतीच. त्यामुळे संघटना बांधणीकडे दुर्लक्ष होत आहे अशी कुजबूज संघटनेत सुरू होती. उद्धव ठाकरे नाहीत तर किमान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी तरी शिवसैनिकांना भेट द्यावी, अशी आशा असताना तीही फोल ठरली. आदित्यने संघटना बांधणीची सूत्रे हातात घेऊन राज्यभर फिरणे अपेक्षित असताना मंत्रिपद स्वीकारले. ज्याचा नकारात्मक परिणाम संघटनेवर झाला आणि पक्ष पुन्हा एकदा मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर उभा राहिला याकडे पुस्तकात लक्ष वेधले आहे.

शिवसैनिकांची पक्षनेतृत्वाशी भेट होत नसताना एकनाथने शिवसैनिकाला आधार दिला. दरबारी मंडळी मात्र कायम एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कारस्थान रचत आली. अगदी २०१४ नंतर मिळणारे शिवसेनेच्या वाट्याचे उप मुख्यमंत्रिपद देखील केवळ एकनाथ शिंदेंना द्यावे लागेल, या विचाराने ते पक्षाने स्वीकारलेच नाही. राजकारणात कार्यकर्ता मोठा झाला तर पक्ष मोठा होतो आणि पक्ष मोठा झाला तर पक्षाचा नेता. याचा विसर दरबारी मंडळींना पडला असेही त्या पुस्तकात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.