शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर केलेल्या आरोपांनंतर आता त्यांनी पुढचं पाऊल उचललं आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याची तक्रार संजय राऊत यांनी पंतप्रधान कार्यालयाला केली आहे. काही अधिकारी खंडणी प्रकरणात गुंतले असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.
आता खेळ सुरू झाला आहे, असे ट्वीट करत आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिक माहिती देऊ, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः मुंबई पोलीस दलात खांदेपालट! हेमंत नगराळेंची आयुक्तपदावरुन बदली अन्…)
काय आहे राऊतांचं ट्वीट?
आता खेळ सुरू झाला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा कशा पद्धतीने आपल्या अधिकार क्षेत्राचा गैरवापर करत आहेत याबाबतची माहिती पुराव्यांसकट पंतप्रधान कार्यालयाला दिली आहे. काही अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करत वसुली एजंटच्या माध्यमातून खंडणी मागत असून काही जणांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत.
Game has just begun!
Today submitd evidences to @PMOIndia of hw Centrl Agencies r misusng powers selctivly agnst a few.Submitd proofs on hw sm officials r indulgd in extortion& blackmailng thru 'Vasuli agents'.
Wil addrss a PC vry soon to share more details.
Watch this space!— Sanjay Raut (@rautsanjay61) February 28, 2022
लवकरच पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिक माहिती आणि पुरावे आपण देणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा संजय राऊत यांच्या आगामी हाय व्होल्टेज पत्रकार परिषदेची चर्चा रंगली आहे.
(हेही वाचाः युक्रेनमधून सुटका होण्यासाठी पाकड्यांनी घेतला तिरंगा! का सुरु झाला #indianstudentsinukraine ट्रेंड?)
राऊतांची पत्रकार परिषद
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 15 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेत केंद्रीय तपास यंत्रणा तसेच भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. आपण लवकरच याबाबतची तक्रार करणार असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे आता पंतप्रधान कार्यालयाला दिलेल्या माहितीत नेमक्या कोणत्या अधिका-यांची नावे आहेत हे पाहणे आता गरजेचे असणार आहे.
Join Our WhatsApp Community