अनिल परबांचे कार्यालय तोडायची ऑर्डर आली…रामदास भाई म्हणाले ‘वाव…व्हेरी गुड!’

दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री आमदार रामदास कदम यांनीच पुरवल्याचा गंभीर आरोप माजी आमदार संजय कदम थेट पत्रकार परिषदेत केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

90

शिवसेनेत भूकंप घडवून आणणारी धक्कादायक घटना शनिवारी, २ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. त्याला कारणीभूत मनसेचे खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर व माजी आमदार संजय कदम ठरले आहेत. त्यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि आरटीआय कार्यकर्ता प्रसाद कर्वे यांच्यातील मोबाईलवरील संभाषणाची धवनिफीत उघड केली. त्यामध्ये कर्वे म्हणतात,  ‘भाई… अनिल परब यांच्या वांद्र्यातील कार्यालयावर कारवाई करण्याची ऑर्डर आली आहे. त्यावर रामदास कदम म्हणतात, ‘अरे व्वा..व्हेरी गुड व्हेरी गुड!’ या शिवाय कर्वे हे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना कागदपत्रे पुरवत आहेत, हे स्पष्ट होणारे संभाषण समोर आले आहे. दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री आ. रामदास कदम यांनीच पुरवल्याचा माजी आमदार संजय कदम थेट पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केला आहे.

ज्या दोघांनी ही पत्रकार परिषद घेतली ते दोघेही आधी शिवसेनेत होते, आता एक मनसेचा आहे आणि दुसरा राष्ट्रवादीचा आहे, ते दोघेही माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रसाद कर्वे हा माझा पीए नव्हताच. किरीट सोमय्या यांच्याशी माझा १५-२० वर्षांपासून संबंध नाही. मी शिवसेनेचा जबाबदार नेता आहे. पाठीत खंजीर खुपसण्याचा माझा स्वभाव नाही. कर्वे हा माहितीचा अधिकारी कार्यकर्ता आहे. त्याला सगळेच ओळखतात. अनिल परब यांच्या हॉटेलला हात लावू देणार नाही, असे माझा मुलगा स्वतः पत्रकार परिषदेत बोलला आहे. माझ्यावर असे आरोप करणाऱ्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात बदनामीचा खटला भरणार आहे.
– रामदास कदम, शिवसेना नेते.

दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री आमदार रामदास कदम यांनीच पुरवल्याचा गंभीर आरोप माजी आमदार संजय कदम थेट पत्रकार परिषदेत केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर व माजी आमदार संजय कदम यांचीही संयुक्त पत्रकार परिषद घेत ही माहीती दिली. इतकेच नाही तर त्यांनी पुराव्यासाठी मोबाईल वरील संभाषणाच्या ऑडिओ क्लीपच पत्रकार परिषदेत सादर केल्या.

(हेही वाचा : गडकरी म्हणाले, आम्हाला विदर्भाची लाज वाटते!)

शिवसेनेच्या अंतर्गत वादाचा परिणाम कोकणच्या पर्यटन व्यवसायावर होतोय!

महाविकास आघाडीत काही सुर्याजी पिसाळ तयार झाले आहेत. आमची भूमिका ही कोकणातील पर्यटन व्यवसायाच्या बाजुने आहे. रामदास कदम व पालकमंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्यात वाद असतील तर त्यांनी परस्पर मिटवावेत, मात्र त्यांच्या वादाचा त्रास जर आमच्या पर्यटन व्यावसायिकांना होतोय, त्यामुळे कोकणातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असा इशाराही यावेळी संजय कदम यांनी दिला. जो प्रसाद कर्वे माहितीचा अधिकार वापरून माहिती जमवतो आणि रामदास कदम त्याचा उपयोग करत असतील, तर तो कर्वे त्यांनाही भविष्यात भारी पडेल. कारण त्याने मोबाईलवर कॉल रेकॉर्डवर ठेऊन रामदास कदम यांना कॉल केले आहेत, यातून अर्थ स्पष्ट निघत आहे. आम्ही या सगळ्याचे पुरावे आमच्या नेत्यांकडे दिले आहेत, अशीही माहिती माजी आमदार संजय कदम यांनी दिली. किरीट सोमय्या यांची जर पुन्हा वक्रदृष्टी पडली तर आम्ही त्यांना रोखू, असा इशारा मनसेचे कोकण विभागीय संघटक नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.