‘2024 ला आमदार होऊन दाखवं’; रामदास कदम यांचे भास्कर जाधव यांना खुले आव्हान

ramdas kadam allegation on uddhav thackeray
..तर उद्धव ठाकरेंना मला आणि माझ्या मुलाला संपवण्यात यश आलं असतं; रामदास कदमांचा गंभीर आरोप

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांना खुले आव्हान दिले आहे. 2024 ला तू आमदार होऊ दाखव. काहीही झाले तरी मी भास्कर जाधवला आमदार होऊ देणार नाही, असा धमकीवजा इशारा कदम यांनी भास्कर जाधव यांना दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेपूर्वी रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल करत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा कशी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

( हेही वाचा: भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाशिक- मालेगाव एसटीतून केला प्रवास )

राजकारणात जाधव यांना गाडणार

योगेश कदमला पाडण्यासाठी खूप प्रयत्न झाले, पण त्याच्या शंभर पिढ्या आल्या तरी योगेश कदम संपणार नाही. आम्ही ठरवले आहे, भास्कर जाधव हा नाच्या असून त्याला मी राजकारणातून गाडल्याशिवाय राहणार नाही, असेही रामदास कदम म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची सभा ऐतिहासिक ठरेल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदार यांनी उठाव केला नसता तर आम्ही राजकारणातून संपलो असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले पाहिजे. शनिवारी होणारी सभा ऐतिहासिक ठरेल, असे म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here