“नवा संसार सुखाने करा, जनतेच्या समस्या सोडवा” राऊतांनी दिल्या मुख्यमंत्री शिंदेंना शुभेच्छा

130

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नवा संसार सुखाने करा, असे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना म्हटले आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा त्यांनी सरकारच्या समस्या सोडवाव्या. आम्ही सरकारमध्ये अडथळे निर्माण करणार नाहीत, असे राऊत यावेळी म्हणाले.

जिथे ठाकरे तिथे शिवसेना

देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंचे उजवे हात आहेत. आता दोघांनी मिळून राज्य पुढे न्यावे, असे राऊत म्हणाले. फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांच्या पक्षात वरिष्ठांचे आदेश पाळण्याची परंपरा आहे. पक्षादेश पाळावा लागतो, आम्हीही पाळतो, तोच त्यांनीही पाळला, असे राऊत यांनी म्हटले आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले असे म्हणणार नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना, ते पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना मानतात याचा आनंद आहे, असे देखील संजय राऊत म्हणाले.

( हेही वाचा: सर्वोच्च न्यायालयाचा शिवसेनेला दणका; तातडीने सुनावणीस नकार, ११ जुलैलाच होणार सुनावणी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.