शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत, कोल्हापूरचा दौरा हा संघटनात्मक बांधणीसाठीच असल्याचे म्हटले. कोल्हापूरात शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी लोकांच्या मनात कमालीची आस्था आहे, आदर आहे. विरोधी पक्षाची भूमिका ही विरोध करायचा म्हणून आहे हे सातत्याने दिसते. महाविकास आघाडी किंवा शिवसेनेने एखादी भूमिका वा निर्णय घेतला मग तो राज्याच्या हिताचा असला, तरी त्यावर टीका ही केलीच पाहिजे असे बहुतेक त्यांनी ठरवल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करायची अशी भूमिका विरोधी पक्षाने घेतली आहे. त्यातून त्यांना काय आसुरी आनंद मिळतो माहिती नाही, असे संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.
( हेही वाचा: बृजभूषण सिंहांविरोधात मनसैनिक आक्रमक! दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल )
आमच्यासाठी निवडणुकीचा विषय संपलाय
छत्रपती संभाजी राजेंना शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेत, मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही, असा आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाच्या मालकीचे नाहीत, ते संपूर्ण देशाचे आणि विश्वाचे आहेत. आमच्यासाठी निवडणुकीचा विषय आता संपला आहे. आम्ही संजय पवारांना उमेदवारी दिली आहे, असे संजय राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community