मोदींनी केलेल्या या चार घोषणा म्हणजे ‘एप्रिल फूल’च राऊतांची भाजपवर जोरदार फटकेबाजी!

112

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महागाईवरुन भाजप सरकारला घेरले आहे. मोदी सरकारने केलेल्या घोषणा या एप्रिल फूलच असल्याचे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार फटकेबाजी केली. अजूनही सर्वसामान्य जनता 15 लाख रुपयांची वाट पाहत असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला. केंद्र सरकारने लोकांना एप्रिल फूल करत इंधन दरवाढ केली, अच्छे दिन येणार, दरवर्षी 2 कोटी नोक-या दिल्या जाणार या सगळ्या घोषणा एप्रिल फूलच असल्याचं म्हणत राऊतांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

या चार घोषणा एप्रिल फूलच

एप्रिल फुल हा गंमतीचा विषय नाही. जनतेच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. सरकारने जनतेशी बांधिलकी ठेवली पाहिजे. थापा मारणे, फसवा फसवी करणे बंद केले पाहिजे. अच्छे दिन हे एप्रिल फुलच आहे. खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील, लोक 7 वर्ष झाल वाट बघत आहेत, 2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार हे एप्रिल फुलच, पाकव्याप्त कश्मीर हे हिंदुस्थानमध्ये येणार हे एप्रिल फुलच आहे. महाराष्ट्र किंवा देशात सुडाचे राजकारण करत नाही असे सांगणे हे एप्रिल फुलच असल्याचे राऊत म्हणाले.

( हेही वाचा: आता गृहमंत्री वळसे- पाटलांच्या ‘या’ भुमिकेवरुन आघाडीत बिघाडी! )

आता पाकिटमारांचा तपास तितका बाकी 

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतले. ईडीच्या या कारवाईवर संजय राऊत म्हणाले की, ज्या प्रकारे काश्मीरमध्ये अचानक अतिरेकी घुसतात. बॉम्ब हल्ले करतात आणि निघून जातात. त्याच प्रकारे या केंद्राच्या अतिरेकी कारवाया आहेत. तपास यंत्रणांना राज्यात घुसवले जाते आणि ते अटक करून निघून जातात. जर यातून संघर्ष निर्माण झाला, तर केंद्र आणि राज्य हा संघर्ष फार मोठ्या प्रमाणात होणार. म्हणून ममता बॅनर्जी यांनी गैरभाजप शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्रं पाठवले आहे. त्यांचे पत्र हे याच भूमिकेतून लिहिले आहे. सर्वांनी एकत्र येण्याची त्यांची भूमिका त्याच गोष्टीसाठी आहे, असं सांगतानाच केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिमा धुळीस मिळाल्याचे राऊत यावेळी म्हणाले. आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.