अनिल परबांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत- संजय राऊत

97

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित 7 जागांवर ईडीकडून गुरुवार सकाळपासून छापेमारी सुरु आहे. या छापेमारीवर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल परब हे आमचे सहकारी आहेत, तसेच ते कडवट शिवसैनिकदेखील आहेत. सध्याची जी कारवाई सुरु आहे, ती सुडबुद्धीने सुरु आहे. आम्ही अनिल परबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, तसेच सुडाच्या कारवाईने आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही, असा टोला राऊतांनी लगावला.

ईडीच्या कारवायांमुळे भाजप खड्ड्यात जातय

आम्ही अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. सूडाच्या कारवाईने आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही. या रोजच्या ईडीच्या कारवायांमुळे भाजप खड्ड्यात जात असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणाला इतके वाईट वळण कधीच मिळाले नव्हते. सबळ पुरावे असणा-यांंनी जीतू नवलानीला कुणी पळवले, याचेही उत्तर द्यावे असा सवाल त्यांनी भाजपाला केला.

( हेही वाचा: राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीपूर्वी मंत्रालयातील बत्ती पुन्हा एकदा गुल )

आम्ही पाहून घेऊ… राऊत संतापले 

सरकारला त्रास देण्यासाठीच या कारवाया सुरु आहेत. फक्त शिवसेनेला त्रास द्यायचा आणि त्यांना अडचणीत आणण्यासाठी कारवाया करायच्या, असे प्रयत्न सुरु आहेत. मी केलेल्या आरोपांवर आणि दाखल केलेल्या तक्रारींवर अद्याप उत्तर येत नाही. ईडीकडे आम्ही अनेक प्रकरणे पाठवली आहेत, पण ती फाईल उघडण्याची तसदीही कुणी घेत नाही, आम्ही पाहून घेऊ, असेही राऊत यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.