बूस्टर डोस माहीत नाही, पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल; राऊतांची भाजपवर फटकेबाजी

181

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी बूस्टर सभा घेतली होती. त्यालाच आता प्रतिउत्तर देताना, शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार फटेकबाजी केली आहे. महाराष्ट्रातील देशातील वातावरण आणि वातावरणावर आलेले मळभ, धुकं, गढूळपणा हे उद्धव ठाकरेंच्या भाषणाने दूर होईल. महाराष्ट्रातील आकाश निरभ्र होईल. या आकाशात भगव्या रंगाचाच धनुष्य दिसेल. अर्थात हे राज्य आणि शिवसेना पूर्णपणे शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालत आहे. शिवसेनाप्रमुखांची प्रेरणा आहे. काही लोकं राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सागंतानाच कोणाचा बूस्टर डोस माहित नाही, पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल, असे राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता राज्याला

आजच्या सभेचे व्यासपीठ पाहाल, तर इतके मोठे व्यासपीठ मुंबईत निर्माण झाले नव्हते. भव्य असे व्यासपीठ आहे. शिवसेना आणि गर्दी यांचे नाते आहे. समीकरण आहे. आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही, गर्दी आणावी लागत नाही. बाळासाहेबांचा विचार, राज्याचा विचार, विकासाचा विचार या विचाराचे लोहचुंबक आहे. त्यामुळे लोकं आपोआप जमतात. उद्धव ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता महाराष्ट्राला आणि देशाला आहे. या सभेतून प्रत्येत प्रश्नाचं उत्तर मिळेल, असे राऊत म्हणाले.

( हेही वाचा: मध्य रेल्वेमध्ये नव्याने सुरु झालेल्या 12 एसी लोकलचे वेळापत्रक )

करारा जवाब मिळणार

अडीच वर्षानंतर सभा होत आहे. संपूर्ण देश त्यांचे विचार ऐकू इच्छितो. ऐतिहासिक आणि क्रांतीकारी रॅली होईल. काही लोक राज्याची अशांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना उद्धव ठाकरे करारा जवाब देणार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.