गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच, असे एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेब हे गुरु होते, तसेच त्यांच्यात गुरुर होता. देश आणि महाराष्ट्र त्यांना गुरुस्थानी मानतो. एकनिष्ठेने शिवसैनिक बाळासाहेबांसोबत आहे. एकनिष्ठा हीच गुरुदक्षिणा असते, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
( हेही वाचा: मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली, ठाणे स्थानकात तांत्रिक बिघाड )
पत्रकार परिषद सोडून निघून गेले
संजय राऊत पुढे म्हणाले की, बाळासाहेबांनी आम्हाला सर्व काही दिले. गुरु हा मोकळ्या हाताने देत असतो. बाळासाहेबांनी मोकळ्या हाताने उधळण केली. असा गुरु होणे नाही. ते महाराष्ट्राचे आणि एका अर्थाने देशाचे गुरु होते. प्रत्येक दिवशी या गुरुचे स्मरण आम्हाला होते. आश्चर्य वाटते, काही लोक बाळासाहेबांच्या शिवसेनेतून बाहेर गेले आणि म्हणतात बाळासाहेब आमचे गुरु. आज बाळासाहेब असते तर अशा लोकांना त्यांच्या स्टाईलने फटकारलं असतं, असं राऊत म्हणाले. बाळासाहेबांनी आमच्यावर उपकार केले आहेत. तसेच, त्यांना नगरसेविका शितल म्हात्रे या शिंदे गटात सहभागी झाल्याच्या वृत्तावर प्रश्न विचारला असता, राऊत पत्रकार परिषद सोडून निघून गेले.
Join Our WhatsApp Community