किरीट सोमय्यांनी ओठाखाली टोमॅटो साॅस लावून जखमी झाल्याचा दावा केला, राऊतांचा टोला

125

किरीट सोमय्यांच्या गाडीवर 23 एप्रिलला झालेल्या ह्लल्यानंतर, राजकीय वातावरण तापले आहे. सोमय्यांच्या गाडीवर चप्पला आणि दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यानंतर त्यांना किरकोळ जखम झाल्याचेही पाहायला मिळाले. किरीट सोमय्यांनी या प्रकरणी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन तक्रारही केली आहे. आता यावर पत्रकारांशी संवाद साधताना, शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की,  सोमय्यांना ओठाखाली टोमॅटो साॅस लावून जखमी झाल्याचा दावा केला.

…तर कौतुकच आहे

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांनी राज्यात लोकशाहीला पायदळी तुडवले जात असल्याच्या केलेल्या वक्तव्यावरही संजय राऊत म्हणाले की, ज्या पक्षाचे नेतृत्त्व नरेंद्र मोदी करत आहेत, अशा भाजपाच्या राज्यातील नेत्यांकडून लोकशाहीची प्रवचने झोडली जात असतील, तर त्याचे कौतुकच आहे.

फडणवीसांनी यावरही बोलावे

यावेळी राऊतांनी उत्तर प्रदेशावरही भाष्य केले. ते म्हणाले की मागच्या तीन महिन्यांत 17 खून आणि बलात्कार झाले आहेत. हिटलरशाही, हुकूमशाही, कायदा सुव्यवस्था कोसळणे काय आहे हे आपण पाहिले पाहिजे. आसाम सरकारने गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांना नरेंद्र मोदींबाबत ट्वीट केल्याप्रकरणी अटक करुन सुटका केल्यानंतर पुन्हा अटक केली, हे नेमकं कोणत्या लोकशाहीचे लक्षण आहे. यावरही फडणवीसांनी मनमोकळे केले पाहिजे.

( हेही वाचा: अखेर एलाॅन मस्क बनले ट्वीटरचे मालक; 44 अब्ज डाॅलरचा झाला करार )

शरद पवार बरोबरच बोलले

शरद पवारांनी खूप चांगले वक्तव्य केले,  ते बरोबरच बोलले शरद पवारांनी खूप चांगले वक्तव्य केले. सरकार येऊ शकले नाही, म्हणून जी अवस्थता निर्माण झाली आहे ती फडणवीसांच्या लाऊडस्पीकरमधून बाहेर पडत आहे. सत्ता न आल्याने निर्माण झालेली ही अस्वस्थता आहे.  त्यांनी घरात बसून हनुमान चालीसा म्हणून मन शांत करावे, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.