मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 5 जूनला अयोध्या दौ-यावर जाणार होते. पण ट्वीट करत त्यांनी या दौ-याला तूर्तास स्थगित केल्याचे सांगितले. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्याने, त्यांना टोला लगावला आहे. अयोध्या दौ-यासाठी मदत लागली असती, तर आम्ही नक्कीच सहकार्य केले असते, अशा शब्दांत संयज राऊत यांनी नाव न घेता राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
राऊतांचा राज ठाकरेंना टोला
माध्यमांशी संवाद साधताना, संजय राऊत म्हणाले की अयोध्येत इतर पक्षाचे काही कार्यक्रम होते. त्यांनी ते रद्द केले. त्यांना काही सहकार्य हवे असते, तर आम्ही नक्कीच दिले असते, शेवटी अयोध्या आहे. शिवसेनेला मानणारा वर्ग अयोध्येत आहे. उत्तर प्रदेशातील राजकारण्यांनी आणि इतरांनी शिवसेनेला नेहमीच सहकार्य केले आहे. त्यांना आम्ही नक्कीच मदत केली असती, असे म्हणत राऊत यांनी राज ठाकरेंना डिवचले.
#अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1
— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022
( हेही वाचा: अटकपूर्व जामीन मंजूर होताच संदीप देशपांडे, धुरी ‘शिवतीर्था’वर! )
…तर शिवसेनेने मदत केली असती
त्यांच्यावर दौरा रद्द करण्याची नामुष्की आली असा शब्द मी वापरणार नाही. काय अडचणी आहेत माहिती नाही. भाजपने असे का करावे? पण ठीक आहे. यातून काही लोकांना शहाणपण आले तर बर होईल. यातून नुकसान होते हे काही लोकांना उशिरा समजते. काही लोक तिर्थयात्रेला जात असतात. तेव्हा लोकांना येणा-या अडचणीत शिवसेना त्यांना मदत करते. त्यात राजकारणाचा अभिनिवेश मागे ठेवतो, असेही राऊत यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community