रामनवमी आणि हनुमान जयंतीला झालेले हल्ले नियोजित… यावर पंतप्रधान गप्प का? राऊतांचा सवाल

144

राज्यातील वातावरण सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा यावरुन चांगलेच तापले आहे. शनिवारी झालेल्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने निघालेल्या शोभायात्रेत दिल्लीत हल्ला झाला. तसेच, रामनवमीलाही देशातील पाच राज्यांत हल्ले करण्यात आले. त्यावरुन आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांना प्रश्न केला आहे. देश पेटत असताना, हे सगळे दंगे नियोजित असताना, पंतप्रधान मौन का? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे.

हे नव हिंदुत्ववादी ओवैसी

रामनवमी तसेच हनुमान जयंतीला याआधी कधीच हल्ला झाला नाही. मग यावर्षीच हल्ले कसे काय होत आहेत. आणि झालेल्या या दंग्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मौन राहणे गंभीर असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. पंतप्रधानांनी सांप्रदायिक एकतेबाबत बोलले पाहिजे, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. तसेच, दंगे भडकवणे हे नव हिंदुत्ववादी ओवेसांचे लक्ष्य असल्याचा आरोपही त्यांनी विरोधकांवर केला आहे.

( हेही वाचा: राज ठाकरेंचा पुणे दौरा चर्चेत! पत्रकार परिषदेत ‘राज’ गरजणार )

प्रभू रामही अस्वस्थ झाले असते

 प्रभू रामाच्या नावे जातीय वणवा पेटवणे हा प्रभू रामाचा अपमान असल्याचेही यावेळी राऊत म्हणाले. मध्य प्रदेशातील खरगोन येथील घडामोडींमुळे भगवान रामही अस्वस्थ असतील, असे विधान राऊत यांनी यावेळी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.