Maharashtra Political Crisis: गुलाबराव पाटलांचा तो व्हिडीओ ट्वीट करत, राऊतांनी दिला केसरकरांना इशारा

102

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रविवारी सभेत नाराज आमदारांवर जोरदार प्रहार केल्यानंतर, आता एक व्हिडीओ ट्वीट करत हल्लाबोल केला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ आहे. ट्वीट करत संजय राऊत म्हणाले की, बाप बदलण्याची भाषा कोण करत आहे पाहा. श्रीमान केसरकर, थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्मग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

काय म्हटलंय व्हिडीओ

गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका भाषणाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत गुलाबराव पाटील म्हणत आहेत की, शिवसेनेत पुंगी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले. शिवसेनेत रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले. पानटपरी चालवणारे गुलाबराव पाटील तुमच्यासमोर मंत्री म्हणून बोलतोय. हे सोडा सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले. कतलिया कही साप बदल लेते है, पुण्य की आड में पाप बदल लेते है, मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल लेते है, असे गुलाबराव पाटील या व्हिडीओत म्हणत आहेत.

सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका

सामनाच्या अग्रलेखातून नाराज आमदारांना ‘नाच्या’ म्हणत टीका करण्यात आली आहे. शिवसेनेच्या 15 नाराज आमदारांना केंद्राने वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि याच निर्णयावर सामन्याच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. देशभरात ‘वाय’ वाल्यांची फौजच त्यांना उभी करायची आहे काय? त्यांच्या याच फौजेत आता गुवाहाटीमध्ये असलेल्या 15 गद्दार ‘नाच्यां’ ची भर पडली आहे. त्यांनाही केंद्राने वाय प्लस सुरक्षा देण्याचे जाहीर केले आहे. मोदी सरकारचा हा निर्णय केंद्रीय सुरक्षेची ‘वाय-झेड’ करणारा तर आहेच, शिवाय गुवाहाटीत सुरु असलेल्या महाराष्ट्रद्रोहाच्या तमाशाचा फड भाजपच्याच तालमीत सुरु असल्याचा पुरावादेखील आहे. भाजपच्या महाराष्ट्रद्रोहाचे पितळ त्यामुळे पूर्णपणे उघडे पडले आहे, असे म्हणत सामनाच्या लेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.