हिंमत असेल, तर पिंजऱ्यातील वाघाच्या मिशीला हात लावा!

प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. एखादा सर्व्हे करण्यासाठी किंवा एखाद्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ते पवारांना भेटले असतील. त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असे संजय राऊत म्हणाले.

चंद्रकांत पाटलांना जर शिवसेना पिंजऱ्यातील वाघ वाटत असेल, तर त्यांना पिंजऱ्यात येण्याचे आमंत्रण देतो. हिमंत असेल तर त्यांनी वाघाच्या मिशीला हात लावून दाखवावा, असे आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील वाक् युद्ध कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. संजय राऊत नंदूरबारमध्ये होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची खिल्ली उडवली. चंद्रकांत पाटलांचा काल वाढदिवस होता. त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेऊ नका, असेही राऊत म्हणाले.

पवार-प्रशांत किशोर भेटीला विशेष महत्व नाही! 

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. एखादा सर्व्हे करण्यासाठी किंवा एखाद्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ते पवारांना भेटले असतील. त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असेही राऊत म्हणाले.

(हेही वाचा : वारकरी बांधवानो, यंदाही विठ्ठलाला घरूनच  नमस्कार करा! )

आरक्षणाचा निर्णय केंद्रातच!

शिष्टाचाराचा भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पंतप्रधानांना भेटायला गेले होते. या भेटीत महाराष्ट्रातील समस्यांवर चर्चा झाली. त्यामुळे या भेटीवर राजकारण करण्याची गरज नाही, मराठा आरक्षणाबाबत आता राज्याची भूमिका राहिलीच नाही. आता केंद्रालाच भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे, असेही राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here