पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी कोठडीत असलेल्या संजय राऊत यांना बुधवारी जामीन मिळाला. त्याचे निमित्त साधत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
( हेही वाचा : मुंबईतील काही भागांमध्ये पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये गोवर,रुबेलाचा संसर्ग)
तब्बल १०२ दिवस कोठडीत असलेल्या संजय राऊत यांना बुधवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. सायंकाळी उशिरा त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली. राऊत कारागृहाच्या बाहेर येताच शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. ‘मी लढवय्या शिवसैनिक असून, पक्षासाठी मरायलाही तयार आहे. मी तुरुंगात असताना माझ्या भावाने सर्व जबाबदारी स्वीकारली. माझ्या अनेक आई आहेत, मी तुरुंगात जात असताना त्यांच्या डोळ्यात पाणी होते. आता आनंदाश्रु आहेत’, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन
कारागृहातून बाहेर पडल्यानंतर राऊतांनी पंचमुखी हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात दाखल झाले. तेथून पुढे दादरच्या शिवाजी पार्कमधील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ते नतमस्तक झाले. या दरम्यान शिवसैनिकांनी जागोजागी त्यांचे स्वागत केले. शिवाजी पार्कमधून पुढे ते मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले.
Join Our WhatsApp Community