सरकार पाडण्यासाठी ईडीच्या धाडी! संजय राऊतांचा आरोप

142

मला दिल्लीतील काही जण सांगत होते की, तुम्ही महाराष्ट्राचे सरकार पाडा, नाही तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील, तुम्हाला फिक्स करतील. तुम्ही आम्हाला मदत केली नाही, तर तुम्ही नंतर पश्चात्ताप कराल. पण मी त्यांना स्पष्ट सांगितले, महाराष्ट्राच्या सरकारला नख लावण्याचे आम्ही पाप करणार नाही. त्यांना ‘शरद पवार यांच्या कुटुंबावरही ईडीच्या धाडी टाकण्यात येतील’, असे सांगितले. त्याप्रमाणे धाडी पडल्या. तिसऱ्याच दिवशी माझ्या घरावर धाडी पडल्या. मुलुंडचा दलाल सांगतो की, आता कुणावर धाडी पडणार आहे. तुम्हाला काय वाटते, आम्ही झुकू. पण लक्षात घ्या, बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवले आहे झुकायचे नाही. हे सरकार पडणार नाही हे मी वारंवार सांगत आहे, त्यामुळे ते माझ्या आजूबाजूच्या लोकांना अडकवण्यास सुरुवात केली आहे. माझे मित्र, मुले, कुटुंब यांना बदनाम करत आहे. मुलांना फोन करून तुमच्या वडिलांना अटक करणार आहे, असे सांगत आहेत, इतके निर्घृण कृत्य भाजपकडून सुरु आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

…तर किरीट सोमय्यांना जोड्याने मारू 

उद्धव ठाकरे यांनी मला लोकांसमोर सत्य येऊ द्या,असे सांगितले आहे. खरे तर ही पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयासमोर घेण्याचे नियोजन केले होते. पण सुरुवात सेना भवनातून करू आणि शेवट ईडीच्या कार्यालयात करू. बाहेरचे लोक आमच्या बायकांवर नजर टाकणार. भाजपचा दलाल म्हणतो की, ठाकरे कुटुंबाने अलिबाग येथे १९ बंगले बांधून ठेवले आहेत, माझे दलालाही आव्हान आहे. आपण चार बस करून त्या बंगल्यात पिकनिक काढू, जर तिथे बंगले दिसले, तर मी राजकारण सोडेन आणि बंगले दिसले नाही तर त्या दलाला जोड्याने मारू. रोज १९ बंगले म्हणून खोटे सांगून मराठी माणसाविषयी द्वेष दाखवत आहे. हाच किरीट सोमय्या याने उच्च न्यायालयात मराठी भाषा शाळेत सक्तीची करू नये म्हणून उच्च न्यायालयात गेला, याचे थोबाड आधी बंद करा आणि मग मराठी  भाषेला अभिजात दर्जा देण्याविषयी बोला, असे संजय राऊत म्हणाले.

(हेही वाचा शिवसेना भवन झाले ‘कोरोना मुक्त’?)

गरिबांना धमकावत आहेत

पाटणकर यांनी देवस्थानाची जमीन कुठे आणि कुठून घेतली हे दाखवावे. ही जमीन याच्याकडून त्याच्याकडे त्याच्याकडून याच्याकडे असे १२ माणसांकडून व्यवहार केले, १२ व्या व्यक्तीकडून पाटणकर यांनी जमीन घेतली आहे. देवस्थानाशी त्यांचा संबंध नाही. आनंदराव अडसूळ, अनिल परब, भावना गवळी हे सगळे आपण निर्दोष आहोत, असे सांगत आहेत, आता माझ्यामागे लागले आहेत. मंगळवारी ईडीवाले सकाळी माझ्या बँकेत गेले आणि २० वर्षांचे ट्रान्सक्शन घेऊन गेले आहे. आमच्या गावातील गरीब लोकांच्या जमिनी आम्ही खरेदी घेतल्या, ५५ गुंठे जमीन आहे. त्या जमिनीच्या गरीब मालकांना पकडून ईडीच्या कार्यालयात डांबून ठेवतात, त्यांना धमकी देतात. आमच्या मुलीच्या लग्नात खर्च केलेल्या डेकोरेशनवाल्याकडून चौकशी करत आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

हरियाणातील दूधवाला ७ हजार कोटींचा कसा झाला मालक? 

मी जेथे कपडे लग्नाचे शिवले त्या टेलरकडेही गेले, आता बुटाच्या दुकानात जाण्याचे बाकी आहे. हरियाणात एक दूधवाला आहे. एस नरवीर त्याचे नाव आहे. त्याला ईडीवाले ओळखतात का, तो ५ वर्षात ७ हजार कोटींचा मालक कसा बनला? जसे भाजपचे सरकार आले, तसे त्याचे राज्यात येणे जाणे सुरु झाले, कुणाचा पैसा त्याच्याकडे आहे, कुणी केले मनी लॉण्डरिंग, यातील साडेतीन हजार कोटी हे भाजप सरकारच्या काळात गेले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात आयटी घोटाळा झाला, २५ हजार कोटींचा हा घोटाळा झाला आहे. अमोल काळे कोण आहे, बिना टेंडर कुणी दिले? ५ हजार कोटींचा हिशेब माझ्याकडे आला आहे. तो तपशील केंद्रीय यंत्रणांना पाठवले जाईल आणि पुढे ईडीकडे जाईल. तुम्ही शिवसेनेशी, महाराष्ट्राशी पंगा घेतला आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

(हेही वाचा #Live: शिवसेनेचं ‘संजयास्त्र’)

पीएमसी घोटाळ्यात सोमय्यांच्या मुलाचा संबंध 

पीएमसी बँक घोटाळा आणि पत्रा चाळीचा घोटाळा काढला आहे, त्याच्याशी माझा संबंध जोडला आहे, त्यात माझे मित्र आहे, त्यांच्याशी माझे मित्रत्वाचे संबंध कधीच नाकारले नाही. राकेश वाधवान हा मुख्य आरोपी आहे. त्याला त्या काळात सगळे ओळखायचे, त्याच्या खात्यातून भाजपच्या खात्यात २० कोटी गेले आहेत. राकेश वाधवान भयंकर व्यक्ती आहे, असे सोमय्या म्हणतो, तर मग निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कुणाची आहे, ती कंपनीही किरीटच्या मुलगा नील याची आहे आणि राकेश वाधवानशी त्यांचे संबंध आहेत. पीएमसी बँक घोटाळ्यात त्याला धमकावून त्याच्याकडून गोखिवरे वसई येथून जमीन घेतली आहे. ४०० कोटींची जमीन साडेचार कोटीत घेतले आहे. त्या जमिनीवर या कंपनीचा संचालक निकॉन फेस १ आणि फेस २ उभारणार आहे. राष्ट्रीय हरित लवादाने परवानगी दिली नाही, कुणाचेही परवानगी घेतली नाही. त्यामुळे केंद्रीय तपास विभागाने ताबडतोब किरीट सोमय्या यांना अटक करावी. एका बाजूला भ्रष्टाचाराच्या विरोधात भजन करायचे आणि आमच्यावर आरोप करायचे, याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशीही मागणी संजय राऊत यांनी केली.

ईडीच्या नावाने मुंबईतील ७० बिल्डरकडून वसुली

पीएमसी बँक घोटाळ्यातील सर्व कागदपत्रे मी ईडी कार्यालयात पाठवले आहेत. हा किरीट सोमय्या ईडीच्या कार्यालयात दही आणि खिचडी खात असतो हे सगळे जण ईडीचे वसुली एजंट बनले आहेत. तुम्ही माझ्याविरोधात कितीही कारस्थाने रचा, मी लढणारच, जितेंद्र चंद्रलाल नवलानी हा कोण आहे. हे नाव ऐकून मुंबई आणि दिल्लीतील ईडीवाल्यांना घाम फुटला असेल, ईडीच्या नावाने मुंबईतील ७० बिल्डरकडून वसुली सुरु आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांना सांगणार आहे. त्यांनी ३०० कोटी जमा केले आहेत. त्यात ईडीचे अधिकारी सहभागी आहेत. महाराष्ट्राला बदनामी करण्याचे कारस्थान आहे. महाराष्ट्र, राजस्थान आणि पश्चिम बंगाल हे तीन राज्ये पाडण्याचे कारस्थान सुरु आहे. आम्ही खूप जीवन बघितले आहे. आमच्या मुलांना धमकावत आहेत. ८० वर्षांच्या म्हाताऱ्यांना घेऊन जात आहेत. अमित शहा यांना निवेदन आहे. आणीबाणीच्या नावावर मोठमोठी भाषणे देतात आता याविषयावरही बोला. ज्या दिवशी माझ्या मित्रांच्या घरावर धाडी पडत होत्या, त्या दिवशी मी अमित शहा यांना फोन करून त्यांना मला त्रास द्या, माझ्या निकटवर्तीयांना का त्रास देता? असे म्हटले होते. हम डरेंगे नही., झुकेंगे नही, हा ट्रेलर आहे, येणाऱ्या काळात मी व्हिडिओ क्लिप आणीन. मोहित कंबोज हा फडणवीसांना बुडवणार आहे. पत्रा चाळीची जमीन विकत घेणारा मोहित कंबोज आहे. राकेश वाधवाण याच्याकडून जमीन कंभोज याने खरेदी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.