हरियाणात एक दूधवाला आहे. एस नरवीर त्याचे नाव आहे. त्याला ईडीवाले ओळखतात का, तो ५ वर्षात ७ हजार कोटींचा मालक कसा बनला? जसे भाजपचे सरकार आले, तसे त्याचे राज्यात येणे जाणे सुरु झाले, कुणाचा पैसा त्याच्याकडे आहे, कुणी केले मनी लॉण्डरिंग, यातील साडेतीन हजार कोटी हे भाजप सरकारच्या काळात गेले आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद
- संजय राऊत शिवसेना भवनावर दाखल
- शिवसेनेचे अनेक नेते शिवसेना भवन येथे दाखल
- थोड्याच वेळात प त्रकार परिषदेला होणार सुरुवात
- भाजपचे ते साडे तीन नेते कोण?
- कोणाची नावे घेणार संजय राऊत?
- संजय राऊत यांचे पत्रकार परिषदेसाठी आगमन
- संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात
- आदेश बांदेकर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मंत्री उदय सामंत पत्रकार परिषदेसाठी उपस्थित
संजय राऊत
- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरम करतो.
- मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख वर्षावरुन पत्रकार परिषद पाहत आहेत.
- शरद पवार यांनी देखील फोन करुन पत्रकार परिषदेसाठी दिले आशिर्वाद
- आप आगे बढो हीच सर्व शिवसैनिकांची इच्छा
- गुन्हा केला नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नका, ही बाळासाहेबांची शिकवण आहे.
- याच शिकवणुकीवर उद्धव ठाकरे शिवसेनेला पुढे नेत आहेत.
- शिवसेना ही गांडुची अवलाद नाही.
- महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर गेले काही दिवस आरोप करण्यात येत आहेत.
- महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत आहे.
- तुम्ही शरण या नाहीतर आम्ही सरकार पाडू अशा धमक्या देण्यात येत आहेत.
- भाजपचे नेते वारंवार तारखा देत आहेत.
- भाजपचे काही प्रमुख नेते मला भेटले.
- तुमच्या लोकांना टाईट करण्याचा काम आम्ही करू असे भाजपच्या नेत्यांनी मला सांगितले.
- पवार कुटुंबीयांवर ईडीकडून धाडी घालण्यात येत आहेत.
- बाळासाहेबांनी आम्हाला गुडघे टेकायला शिकवले नाही.
- हे सरकार पडणार नाही असे मी त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
- माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांतील एकही प्रकरण खरं नाही.
- मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन तपास यंत्रणांच्या तारखा देतो.
- महाराष्ट्रात कोण राहतो ते पाहू.
- किरीट सोमय्या यांनी लोकांच्या मनात ठाकरे सरकारविरुद्ध भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
- उद्धव ठाकरे यांचे 19 बेकायदेशीर बंगले आहेत, असे विधान सोमय्या यांनी केले.
- माझं त्यांना आव्हान आहे की ते बंगले आम्हाला शोधून दाखवा.
- ते बंगले जर सापडले तर मी राजकारण सोडीन आणि नाही सापडले तर मी सोमय्यांना जोड्याने मारेन.
- सोमय्यांनी केलेला प्रत्येक आरोप हा खोटा आहे.
- आनंदराव अडसूळ, भावना गवळी, रविंद्र वायकर यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे.
- किरीट सोमय्यांचं थोबाड भाजपने बंद करावं नाहीतर आम्ही गप्प करू
- माझ्या बँक खात्यातून वर्षांपासूनची स्टेटमेंट घेऊन गेले.
- ईडीकडून माझ्या मुलीच्या लग्नाचा हिशोब तपासण्यात आला.
- महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी केलेल्या घोटाळ्याचे पुरावे लवकरच देणार.
- अमोल काळे कोण आहेत, त्यांना कुठे लपवलंय ते सांगावं
- लवकरच ही कागदपत्रं ईडीला सादर करणार
- हरियाणाचा दूधवाला 7 हजार कोटींंचा मालक कसा झाला?
- त्यातील ३ हजार कोटी रुपये राज्यातील भाजप नेत्यांकडून गेली आहेत.
- तुम्ही चुकीच्या माणसाशी पंगा घेतलाय, तुम्ही शिवसेनेशी पंगा घेतलाय.
- राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या कार्यालयाला 20 कोटी रुपये पक्षनिधी देण्यात आले आहेत.
- सोमय्या यांचा मुलगा नील हा राकेश वाधवानचा भागीदार आहे.
- पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टर माईंड राकेश वाधवान याच्यासोबत किरीट सोमय्या आणि त्यांच्या परिवाराचे आर्थिक संबंध आहेत.
- निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कोणाची आहे?
- वसई गोखिवरे येथे पीएमसी बँक घोटाळ्यातले पैसे वापरत कंपनी उभारण्यात आली आहे.
- त्या कंपनीचा मालक नील किरीट सोमय्या आहे.
- देवेंद्र रजनिकांत लधानी हा किरीट सोमय्याचा फ्रेट मॅन आहे आणि त्याने राकेश वाधवान सोबत आर्थिक व्यवहार केलेले आहे.
- या कंपनीत अनेक पर्यावरणीय नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे.
- आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालून किरीट आणि नील सोमय्या यांना अटक करण्याचे आदेश द्यावेत.
- जितेंद्र नवलानी, फरिद शमा, रोमी आणि फिरोज शमा हे चौघे जण कोणाचे एजंट आहे.
- हे चौघं कुठे बसतात, काय अय्याशी करतात हे मी लवकरच सांगणार आहे.
- मुंबईच्या बिल्डरांकडून 300 कोटींची वसूली त्यांनी केली आहे.
- महाराष्ट्र, प. बंगाल आणि झारखंड मधील सरकारं पाडण्याचा हा डाव आहे.
- हम डरेंगेनही, झुकेंगे नही लेकिन आपको झुकाएंगे…
- हा फक्त ट्रेलर आहे.
- लवकरच व्हिडिओ आणि कागदपत्रं घेऊन समोर येणार आहे.
- मोहित कंबोज फडणवीसांना बुडवणार