राज्यातील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित गुरुवारी विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी 5 पर्यंत ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. आता याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, राज्यपालांनी दिलेल्या या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. राज्यपालांनी दिलेला निर्णय हा असंविधानिक असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.
( हेही वाचा महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा; ३० जूनला सकाळी ११ वाजता बहुमत चाचणी )
आजही सर्वोच्च न्यायालयावर विश्वास
राज्यपाल याच दिवसाचा विचार करत होते. ही कायदेशीर कृती आहे. १६ आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे. ११ तारखेपर्यंत निर्णय होणार नाही. या काळात काही झाले तर आमच्याकडे या असे सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला सांगितले आहे. राज्यपाल भवन आणि भाजप मिळून संविधानाची मजाक उडवत आहेत. आमचे लोक सर्वोच्च न्यायालयात जाणार आणि न्याय मागणार, आजची आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे, अशे संजय राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community