रोड टेस्ट आणि फ्लोअर टेस्टमध्ये आम्हीच विजयी होणार; राऊतांनी व्यक्त केला विश्वास

93

शिवसेना आणि शिंदे गटात दरी वाढवण्याचे काम संजय राऊतांनी केल्याचा आरोप नाराज आमदार दीपक केसरकर यांनी केल्यानंतर, सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना, राऊतांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे अजूनही आपल्या जवळचे असल्याचे म्हटले आहे. तसेच, काहीही झाले तरी रोड टेस्ट आणि फ्लोअर टेस्टमध्ये आम्हीच विजयी होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना महाराष्ट्राची माती माफ करणार नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.

पाटलांचा व्हिडीओ ट्वीट करत शिंदे गटाला टोला

संजय राऊत पुढे म्हणाले की, मनसे आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरुन झालेल्या चर्चेने जर का शिंदे गट मनसेमध्ये जाऊन मिळणार असेल आणि त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर याहून मोठी ऐतिहासिक गोष्ट नाही, असे म्हणत मनसेला टोला लगावला आहे. मी बाप काढला अशा चर्चा सुरु आहेत. आताच मी एक ट्वीट केले आहे. गुलाबराव पाटलांचे. ते पाहा. त्यात ते स्वत:चा बाप बदलण्याची भाषा करत आहेत. ते लोक बाप बदलतात, त्यांच्यासाठी त्या व्हिडीओमध्ये गुलाबराव पाटलींनी जे वक्तव्य केले आहे ते खरच मार्गदर्शक आहे.

( हेही वाचा: Maharashtra Political Crisis: राज्यातला सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात; अशी आहे ठाकरे- शिंदे गटाची कायदेपंडितांची फौज )

आत्मा मेलायं आता काय उरलं?

जे लोक 40 वर्ष पक्षात राहतात आणि त्यानंतर पक्ष सोडतात. त्यांचा आत्मा मेला आहे. मग काय उरतं… ते फक्त जिवंत मुडदे. हे शब्द राममनोहर लोहिया यांचे आहेत. जिंदा कौमें पाॅंच साल इंतजार नहीं करती, हेदेखील राममनोहर लोहिया यांचे वक्तव्य आहे. हे शब्द नवे नाहीत, महाराष्ट्र आणि देशासाठी. पण समजून जा तुमची बुद्धी कुंठित झाली आहे. मी सत्य बोलतोय तुमचा आत्मा मेला आहे, असा पुनरुच्चार राऊत यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.