राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या प्रक्रियेत विरोधकांसोबत शिवसेनाही यात सामिल झाली आहे. तर, दुसरीकडे भाजपनेही प्रयत्न सुरु केले आहेत. आता यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी भाजप चर्चा करु शकतो. भाजपला दारे खुली आहेत, असे विधान राऊतांनी केले आहे.
आमची भूमिका उत्तम नेतृत्त्वाची
सध्या संजय राऊत अयोध्येत आहेत. गुरुवारी त्यांनी मिडियाशी संवाद साधताना, हे विधान केले आहे. चर्चेची दारे कधीच शिवसेनेने बंद केली नाहीत. जेव्हा राष्ट्रीय विचार, मुद्दे असतात त्यावेळी शिवसेना नेहमीच सहाकार्य करते. शिवसेना हा राष्ट्रीय बाण्याचा पक्ष आहे. कोणत्याही राष्ट्रीय प्रश्नावर उद्धव ठाकरे हे कधीच दरवाजे बंद करुन बसले नाहीत. राष्ट्रीय भुमिकांवर त्यांनी नेहमीच दरवाजे उघडे ठेवले आहेत. तुमचा प्रश्न राजकीय आहे. पण राष्ट्रीय प्रश्न असेल तर उद्धव ठाकरे कधीही खालच्या पातळीचे राजकारण करत नाहीत. आमची भूमिका देशाला उत्तम नेतृत्व आणि दिशा मिळावी अशीच आहे, असे राऊत म्हणाले.
( हेही वाचा: आता जनरल तिकीट घेऊन मेल आणि एक्सप्रेसमधून करा प्रवास )
म्हणून राहुल गांधींची चौकशी
काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी होत आहे. हा राजकीय दबावाच भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कुणी पुढाकार घेऊ नये, म्हणून अशा प्रकारची कारवाई सुरु आहे. 2024 च्या निवडणुकीची ही तयारी सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community