राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी हालचाली सुरु केल्या आहेत. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. भाजपला जर देशाला मजबूत राष्ट्रपती द्यायचा असेल, संविधानाचे रक्षण करणारा राष्ट्रपती द्यायचा असेल तर त्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला पाहिजे.
देश उभा करायचा आहे. या देशाच्या घटनेचे रक्षण करायचे आहे. या देशातील जनतेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे आहे. या देशाला एखाद्या नेत्याच्या अनुभवाचा फायदा होणार असेल तर ते नेता फक्त शरद पवारच आहेत. पण राज्यकर्त्यांचे मन त्यासाठी मोठे असावे लागते. मन मोठे असेल, तर ते अशा प्रकारचा निर्णय घेतात, असे संजय राऊत म्हणाले.
सगळे पवारांच्या पाठीशी उभे राहतील
संजय राऊत सध्या अयोध्येत आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रपतीपदाबाबतच्या निवडणुकीवर भाष्य केले आहे. शरद पवारांनी विरोधी आघाडीचे नेतृत्व केले पाहिजे. देशात आणि विरोधी पक्षात त्यांच्यासारखा अनुभवी आणि प्रभावी नेता नाही. पवारांनी या विरोधी आघाडीचे नेतृत्व केले पाहिजे. राष्ट्रपतीपदासाठी उभे राहण्यासाठी त्यांनी अनुकूलता दर्शवली तर या निकालात फेरफार होऊ शकतो. पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. राजकारणापलिकडे आणि पक्षाच्या पलिकडे आहे. हे सर्व लोक पवारांच्या मागे उभे राहतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
( हेही वाचा: पंतप्रधानांचा देहू दौरा! आधी ‘नाठाळाचे माथी…’ आता ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म…’ )
निर्णय मुख्यमंत्री घेतील
राष्ट्रपती पदासाठी उमेदवार मजबूत असावा, विरोधी पक्षाचा असला तरी हा चेहरा राष्ट्रपचीपदाचा असावा असे जनतेला वाटावे. तो उभा करणे महत्त्वाचा आहे. तसा चेहरा दिल्यास उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community