90 टक्के विकासकामांमध्ये गडकरींचे योगदान; राऊतांकडून गडकरींवर कौतुकाचा वर्षाव

109

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे 27 मे शुक्रवारी आपला 65 वा वाढदिवस साजरा करत आहेत. गडकरींना शुभेच्छा देताना, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गडकरींच्या कामाचे भरभरुन कौतुक केले आहे. मोदी सरकारकडून जो विकास दाखवला जात आहे, त्यापैकी 90 टक्के काम गडकरींनी केले आहे, असे म्हणत राऊतांनी गडकरींना उंदड, निरोगी आणि दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

देशाच्या विकासातील महाराष्ट्राचे योगदान गडकरींनी दाखवून दिलेय

रस्ते असतील, उड्डाणपूल असतील. अगदी देशाच्या सीमेपर्यंत काम केले आहे. उत्तम रस्ते तयार झाले आहेत, उड्डाणपूल तयार झालेत, दळणवळणाची साधने तयार झाली आहेत, याचे श्रेय नितीन गडकरींनाच जाते, असे राऊत यांनी म्हटले आहे. गडकरी साधा माणूस आहे पण त्यांच्याकडे विकासाचा दृष्टीकोन आहे. विकासाची दृष्टी असलेला आणि विकासाच्या कामात राजकारण न आणणारा शरद पवार यांच्यानंतरचा जर कोणी नेता असेल, तर नितीन गडकरी आहेत, असेही राऊत म्हणाले. गडकरी महाराष्ट्राचे आहेत म्हणून मला सदैव त्यांचा अभिमान आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान काय हे नितीन गडकरींनी मागील सात वर्षांत केलेल्या कामातून स्पष्ट दिसेल, असेही राऊत यावेळी म्हणाले. मी त्यांना माझ्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे उदंड, निरोगी दिर्घायुष्य चिंतितो, अशा शब्दात राऊतांनी गडकरींना शुभेच्छा दिल्या आहेत.

( हेही वाचा :छत्रपती संभाजी राजेंची राज्यसभा निवडणुकीतून माघार; पत्रकार परिषदेत घोषणा )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.