…तर युती कायम राहिली असती, राऊतांच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण

124

शिवसेना काय आहे हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती, असे विधान शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले. संजय राऊत यांनी केलेल्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

शिवसेना काय ते फक्त मुंडेंना कळाली

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. या निमित्त संजय राऊत यांनी त्यांचे कौतुक केले आहे. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती. गोपीनाथ मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. बहुजन समाजाच्या नेतृत्वाची सुरुवात त्यांनीच केली, असे राऊत म्हणाले.

(हेही वाचा – आज होणारी म्हाडाची परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांमध्ये संताप)

आजही तरुणांना लाजवतील असे नेते

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीसह आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे. यावेळी संजय राऊत यांनी शरद पवारांचेही कौतुक केले. ते म्हणाले, यशवंतरावानंतर पवार हे महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे दृष्टे नेतृत्व आहे. पवार यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव करताना राऊत म्हणाले की, शरद पवार सर्वात अनुभवी आणि लोकप्रिय नेते आहेत. कृषी, संरक्षण क्षेत्रात त्यांनी ठोस पावले उचलली. महाविकास आघाडीचा प्रयोग शरद पवारांशिवाय शक्य नव्हता. 81 वर्षांनंतरही पवार एखाद्या तरुणासारखे सक्रिय आहेत. जनतेशी थेट संवाद असलेले, हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील असे काम करणारे नेते म्हणजे पवार आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.