उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेली आरोपी अनिक्षा जयसिंघानीचे वडील शिवसैनिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या त्यांचा सोशल मीडियावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत एक फोटो व्हायरल होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्वीट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल केला होता. यावर बोलत असता ठाकरे गटाच्या प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी सुषमा अंधारेंना टोला लगावला आहे.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या होत्या?
‘जर अनिल जयसिंघानी मविआतल्या सगळ्या पक्षातून फिरला असे बंधू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे म्हणणे मान्य केले तर मग त्याने पहिल्यांदा कुठून चंचुप्रवेश केला हेही पहावे लागेल कारण उल्हासनगर, पाचपखाडी, या भागांमध्ये त्यावेळी आणि आत्तासुद्धा कुणाचे प्रभावक्षेत्र आहे?’ असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी हे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांना टॅग केले होते.
सुषमा अंधारेंच्या ट्वीटवर शीतल म्हात्रे म्हणाल्या…
प्रसार माध्यमांसोबत बोलताना सुषमा अंधारेंच्या ट्वीटवर शीतल म्हात्रे म्हणाल्या की, ‘सुषमा अंधारेंना पक्षात येऊन चार महिने सुद्धा येऊ झाले नसतील, त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर सवाल उपस्थित करावा, एवढी त्यांची पात्रता आहे, असे मला वाटत नाही. त्याच्यामुळे त्यांना जे बोलायचे आहे ते बोलू दे. त्यांनी आधी ज्या पक्षात आलेत त्याचा अभ्यास करावा. त्यांनीच शिवसेनेवर सवाल उठवण्याऐवजी त्यांनीच माहिती सांगावी. कारण त्या फारच ज्ञानी आहे, फार अभ्यास आहे त्यांचा. त्यामुळे त्यांनीच याचे उत्तर द्यावे. सुषमा अंधारेंना उत्तर देण्याइतपत आमच्याकडे वेळ नाहीये.’
(हेही वाचा – मला तोंड उघडायला लावू नका, नाहीतर महाराष्ट्रात स्फोट होतील; संजय राऊतांचा गंभीर इशारा)