शिवसेनेचे मंत्री पोहचले सिल्व्हर ओकवर; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण 

104

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नादाला लागून भाजपशी युती तोडली, यामुळे नाराज झाल्याचे सांगत ज्यांनी आधीच्या शिवसेनेतून बाहेर पडून नंतर भाजपशी युती करत पुन्हा राज्यात शिवसेना – भाजपचे सरकार स्थापन केले, त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री चक्क शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर पोहचले आहेत. यामुळे याजकीय वर्तुळात  चर्चेला उधाण आले आहे. यात उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले यांचा समावेश आहे.

शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवास्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले. अचानक शिवसेनेचे नेते सिल्व्हर ओकवर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. या भेटी वेळी प्राध्यापक प्रदीप ढवळ हे देखील उपस्थित होते. ही भेट कशा संदर्भात होती या संदर्भात कोणाताही खुलासा करण्यात आला नसल्यामुळे भेटीचे कारण गुलदस्त्यातच असल्याचे समजते. या तिन्ही नेत्यामध्ये कुठल्या मुद्यावर चर्चा झाली. याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही.

(हेही वाचा कर्नाटकात मुसलमानांचे आरक्षण रद्द; बोम्मई सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचा निर्णय )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.