भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर पुन्हा एकदा शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत आल्या आहेत. किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत यांनी 24 महिन्यांत मुंबईत 1 हजार घर/ दुकान/ गाळे असलेल्या 36 इमारती विकत घेतल्या असून, 1 हजार कोटींचा घोटाळा समोर आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
सोमय्यांचे ट्वीट
काही दिवसांपूर्वीच आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरावर छापा मारला होता. त्यानंतर आता रविवारी ट्विट करत, किरीट सोमय्या यांनी जाधव यांच्यावर आरोप केले आहेत. शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत यांनी 24 महिन्यांत मुंबईत 1 हजार घर/दुकान/गाळे असलेल्या 36 इमारती विकत घेतल्या असून 1 हजार कोटींचा घोटाळा बाहेर आल्याचा दावा सोमय्यांनी केला. ईडी, कंपनी मंत्रालय, आयकर विभागाद्वारे तपास चालू आहे, काही दिवसात कारवाईची अपेक्षा आहे,असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. जाधव परिवाराकडे एवढी मालमत्ता आहे, तर त्यांच्या “मालक – नेत्यां” कडे किती असणार!!!? , असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे.
शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत यांनी २४ महिन्यात मुंबईत १००० घर/दुकान/गाळे असलेल्या ३६ बिल्डिंग ( जुन्या पघडीचा इमारती) विकत घेतल्या
₹१००० कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे
ED इ डी, कंपनी मंत्रालय, आयकर विभाग…द्वारा तपास चालू आहे, काही दिवसात कारवाईची अपेक्षा
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 20, 2022
( हेही वाचा: कटिंगचा चस्का, खिशाला चटका )
जाधवांच्या अडचणीत वाढ
किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनंतर आणि आयकर विभागाने जाधवांच्या घरी मारलेल्या छापेमारीनंतर जाधव दांपत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जवळपास चार दिवस जाधवांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. त्यावेळी काही कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली होती.