राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने केली संभाजीराजेंची कोंडी

114

राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यापैकी महाराष्ट्रातून सहा उमेदवार निवडून जाणार आहेत. ही निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे संभाजी राजे यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी त्यांनी राज्यातील सर्व पक्षांच्या पाठिंब्यासाठी आवाहनही केले आहे. पण आता या निवडणुकीसाठी शिवसेनेने संभाजीराजेंची कोंडी केल्याची माहिती मिळत आहे. संभाजी राजे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर आपण त्यांना उमेदवार देऊ, अन्यथा आम्ही आमचा सहावा उमेदवार मैदानात उतरवू, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याची माहिती मिळत आहे.

सोबत आले तर ठीक, नाहीतर…

राज्यसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे म्हटल्यानंतर संभाजी राजे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पाठिंबा दर्शवला. तसेच राज्यातील सर्व पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असं आवाहन संभाजी राजे यांनी केल्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस याबाबत काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण जर संभाजी राजेंनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात येईल. ते जर आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असतील, तर आम्ही शिवसेनेकडून सहावा उमेदवार उभा करू, असं म्हणत शिवसेनेने संभाजी राजे यांना कोंडीत पकडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता संभाजी राजे यावर काय भूमिका घेतात हे येत्या काळात पहायला मिळणार आहे.

(हेही वाचाः सुप्रिया सुळे म्हणतात, आता बसं झालं… मी मध्यस्थीला तयार)

राष्ट्रवादी शब्द पाळणार की मित्रत्व जपणार?

राज्यसभा निवडणुकीत संभाजी राजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उरलेली सर्व मते देण्यात येतील, असा शब्द राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण आता जर शिवसेनेने आपला उमेदवार मैदानात उतरवला, तर राष्ट्रवादी संभाजी राजेंना दिलेला शब्द पाळणार की शिवसेनेसोबतचं राजकीय मित्रत्व जपणार, हे पहाणं आता महत्वाचं ठरणार आहे.

(हेही वाचाः ‘तर मी हात तोडून हातात देईन’,सुप्रिया सुळेंना का झाला संताप अनावर?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.