शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा 10 जून रोजी प्रस्तावित आहे. त्यासाठी शिवसैनिकांकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. पण हा दौरा आता लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे.
म्हणून दौरा लांबणीवर
10 जून रोजी राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक घेण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे हे विधानसभा आमदार असल्यामुळे त्यांचा देखील मतदार म्हणून या निवडणुकीत सहभाग असणार आहे. याच दिवशी आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा असल्यामुळे हा दौरा पुढे जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.
(हेही वाचाः आता आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौ-यालाही विरोध)
आदित्य ठाकरेंच्या दौ-याला विरोध
शिवसेना मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौ-याला महाराणा प्रताप सेनेने विरोध केला आहे. या सेनेचे संस्थापक राजवर्धन सिंह यांनी या दौ-याविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आदित्य ठाकरे यांचे राम मंदिर भेटीसाठी अयोध्येत स्वागतच आहे. त्यांचे आजोबा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात फार मोठे योगदान दिले आहे. मात्र मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं मानसिक संतुलन हे सोनियाभिमुख झाले आहे. त्यामुळे अशा लोकांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा राजवर्धन सिंह यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community