मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला अल्टिमेटम दिलं आहे. 3 मेपर्यंत जर हे भोंगे हटले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणयात येईल, असं आवाहनही राज ठाकरे यांनी ठाण्यातील आपल्या सभेत केलं आहे.
त्यावरुन राज ठाकरेंवर महाविकास आघाडी सरकारमधील नेते टीका करत असतानाच आता शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे. भोंग्यांमधून पेट्रोल, डिझेलच्या किंमती कशा वाढल्या ते सांगा, अशी टीका त्यांनी केली आहे.
(हेही वाचाः पोलीस सज्ज आहेत! मनसेच्या अल्टिमेटमला गृहमंत्र्यांचा इशारा )
साठ वर्ष मागे जाऊ नये
भोंग्यांबाबत राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंच्या विधानाबाबत जास्त काही बोलण्यापेक्षा भोंग्यांतून वाढलेल्या किंमतींबद्दल देखील जर लोकांना सांगता आलं, तर बरं होईल. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीबाबत भोंग्यांवरुन सांगावं. साठ वर्ष मागे न जाता गेल्या दोन महिन्यांतच हे का झालं ते सांगावं, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
राज ठाकरेंसह 10 जणांवर गुन्हा दाखल
शस्रास्त्र कायद्यांतर्गत राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे राज्याच्या गृह विभागाकडून सांगण्यात येत आहे. ठाण्यातील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी तलवार उंचावून दाखवल्यामुळे या कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका राज ठाकरेंवर ठेवण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासोबतच इतर 10 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचाः उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा तलवार उंचावलेला फोटो दाखवत मनसेचा राज्य सरकारला सवाल! ‘आता यांचं काय?’)
Join Our WhatsApp Community