विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भाजपच्या बूस्टर डोस सभेत शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. ज्यावेळी बाबरी मशिद पाडली तेव्हा तिथे एकही शिवसैनिक नव्हता, असा आरोप फडणवीसांनी केला. यावरुन त्यांना आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला आहे. फडणवीसांचं 1857च्या युद्धातही योगदान होतं, असं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
फडणवीसांचं 1857 च्या युद्धातही मोठं योगदान आहे. पण या वादामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आता अयोध्येत राम मंदिर निर्माण होत आहे. पण त्याही पुढे महाराष्ट्र आणि देशासमोर बेरोजगारी महागाई सारखे अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. पण एकीकडे महाविकास आघाडी सरकार विकासाची कामं करत असताना विरोधकांकडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल म्हणाल्या राज ठाकरे हे ‘सुपारी बहाद्दर’)
फडणवीसांचा गौप्यस्फोट
बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा हा देवेंद्र फडणवीस त्याच ठिकाणी होता. त्यानंतर 18 दिवस मी सेंट्रल जेलमध्ये घालवले. आम्ही विचारतो तेव्हा तुम्ही कुठे होतात. बाबरी पाडली तेव्हा एकही शिवसेनेचा नेता तिथे नव्हता, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. बाबरी पडल्यावर ३२ आरोपी होते, त्यात सगळे भाजपचे नेते होते. ३० वर्षे या सगळ्यांनी आरोप सहन केले, त्यात शिवसेनेचा एकही नेता आरोपी नव्हता. आमचा दोष एकच आम्हाला प्रसिद्धी करता येत नाही आणि अनुशासन तोडता येत नाही, असेही फडणवीस म्हणाले होते.
(हेही वाचाः बाबरी पाडली तेव्हा तिथे शिवसेनेचा एकही नेता नव्हता! देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट)
Join Our WhatsApp Community