आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार, काय आहे तारीख?

150

गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिदुत्वाचं वादळ पुन्हा एकदा घोंगावू लागलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना हनुमान चालिसेचा उतारा दिल्यानंतर राम नवमी आणि हनुमान जयंतीला राज्यातील प्रमुख पक्षांकडून ठिकठिकाणी महाआरती आणि हनुमान चालिसा पठण करण्यात आले.

त्यातच आता शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी अयोध्या वारी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर करण्यात येणा-या टीकेला आदित्य ठाकरे प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले जात आहे.

(हेही वाचाः ‘ते’ भोंगे हटणार नाहीत… राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला गृहमंत्र्यांचं उत्तर)

काय आहे तारीख?

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि माझी याबाबत चर्चा झाली आहे. खूप दिवस आमचं अयोध्येला जाणं लांबणीवर पडत आहे. लवकरच आपण याची तारीख जाहीर करू, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेना-मनसे कडून हनुमान जयंती उत्सव 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यातील कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौकातल्या हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती सुद्धा करण्यात येणार आहे. तर आदित्य ठाकरे यांच्याकडून गिरगावच्या माधवबाग येथील हनुमान मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. काही पक्षांनी आता हनुमान चालिसा पठण करायली सुरुवात केली आहे. शिवसेनेकडून वर्षानुवर्षे हे करण्यात येत आहे, असा अप्रत्यक्ष टोलाही आदित्य ठाकरे यांनी मनसेला लगावला आहे.

(हेही वाचाः राज ठाकरेंनी शिवसेनेला केले मंदिराबाहेर उभे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.